ETV Bharat / city

नवी मुंबईत 78 कोरोनाचे नवे रुग्ण, तर 41 कोरोनामुक्त होऊन परतले घरी

author img

By

Published : May 28, 2020, 10:43 PM IST

नवी मुंबई शहरात अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसून येत आहे.

Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई- शहरात कोरोनाचा कहर वाढत असून, दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. आजही नवी मुंबईत 78 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सकारात्मक बाब म्हणजे आजच 41 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

शहरात अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहरात धोक्याची पातळी ओलांडली आहे. नवी मुंबई शहरात आत्तापर्यंत 1942 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 11040 लोकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 8134 जण निगेटिव्ह आले असून, 974 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे.

सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1931 इतकी आहे, आज 78 जण आज (28 मे ) कोरोना पॉझिटिव्ह आले असून तुर्भेमधील 23, बेलापूर 13, कोपरखैरणे 8, नेरुळ 11 व वाशीतील 7, घणसोली 4, ऐरोली 11, दिघ्यामधील 1, असे एकूण 78 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 28 स्त्रिया व 50 पुरुषांचा समावेश आहे. शहरात 1931 इतका कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झाला आहे.

आत्तापर्यंत नवी मुंबईत 881 व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून, बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. आज नेरूळमधली 5 , बेलापूर 5, वाशी 1, तुर्भे 19, घणसोली 6, ऐरोली 5 व अशा एकूण 41 जण आज कोरोनामुक्त झाले असून, बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये 15 स्त्रिया आणि 26 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थिती मध्ये 881 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 61 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.