नवी मुंबई- पनवेल महापालिका क्षेत्रात आज (30 मे) तब्बल 30 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 12 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कामोठ्यातील 9, कळंबोलीतील 7 तर टेंभोडे 1, खारघरमधील 5, नवीन पनवेल 3, पनवेल 2, रोहिंजण 2 तर खांदा कॉलनीतील एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण 426 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 315 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 189 ॲक्टीव्ह रुग्ण आढळले आहेत.
कामोठ्यात कोरोनाचे 9 नवे रुग्ण आढळले आहेत. कामोठे, सेक्टर-16, मधील 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कामोठे, सेक्टर-11, येथील 36 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे. याशिवाय कामोठे, सेक्टर-35, येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.
कामोठे, सेक्टर-7, येथील 47 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कामोठे येथील एका रुग्णालयामध्ये कार्यरत असलेली 30 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे. तसेच कामोठे, सेक्टर-5 येथील 65 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कामोठे, सेक्टर-21, सत्यम आर्केड सोसायटीतील 64 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे. याशिवाय कामोठे, सेक्टर-25, येथील 49 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे.
कळंबोलीत 7 तर टेंभोडे येथे एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. खारघर मध्येही 5 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर नवीन पनवेलमध्ये 2 व नवीन पनवेलमध्ये 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे व रोहिंजन येथील एकाच कुटुंबातील 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर खांदा कॉलनीमध्ये 1 नवा रुग्ण आढळून आला आहे. आज पनवेल महापालिका हद्दीतील 21 जण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये कळंबोलीतील 5 कामोठ्यातील 3, खारघरमधील 2 तसेच नवीन पनवेलमधील 2 रुग्णांचा समावेश आहे.