ठाणे - महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा नागरिकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. महापालिकेच्या आनंदनगर लसीकरण केंद्रावर एका महिलेला केंद्रामध्ये एकदा लस देण्याऐवजी चक्क तीनवेळा लस देण्यात आली. असा प्रकार पहिल्यांदाच पुढे आला आहे. महानगरपालिकेच्या कर विभागात काम करणाऱ्या वैभव साळवे यांच्या पत्नीचे लसीकरण 25 जून रोजी आनंद नगर लसीकरण केंद्रांमध्ये झाले. ही लस दिल्यानंतर दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा एकाच वेळी एकाच दिवशी लस टोचल्या समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पालिका प्रशासनाने आणि डॉक्टरांनी या महिलेला काही त्रास होत आहे का ? हे पाहिले. शिवाय महिलेच्या पतीवर प्रशासनाने दबाव टाकल्याची माहिती पुढे आली आहे. दबाव आणि नोकरीच्या भीतीला पोटी महिलेचे पती माध्यमांसमोर बोलायला तयार नाही. मात्र या संदर्भात भाजपाच्या नगरसेविकेला हा प्रकार सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
- कोविड रुग्णालयातील मृतदेह आदली बदली
- कोविड रुग्णालयात महिलेचा उपायुक्तांकडून विनयभंग
- कोविड कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा प्रकार
- कमी वयाच्या अभिनेत्रींना लसीकरण केल्याचा प्रकार
- कोविड रुग्णाचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत टाकून देणे
दरम्यान या संपूर्ण प्रकारावर आम्ही चौकशी करून माहिती देऊ, अशी भूमिका पालिका आयुक्तांनी मांडली आहे. तर या प्रकरणात महापौरांनीही चौकशीचे आदेश दिले आहे. शिवाय या प्रकरणी पालिका वैद्यकीय अधिकाऱ्या स्पष्टीकरण देतांना असा प्रकार घडलाच नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे चौकशी नंतरच सर्व प्रकार समोर येणार आहे.