ETV Bharat / city

कोविड रुग्णालयातील लिफ्ट कोसळून कोरोना रुग्णासह तिघे गंभीर जखमी - corona update thane

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोविड रुग्णालयात आगीच्या घटनासह ऑक्सिजनची गळती सारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. अशीच एक दुदैवी घटना कल्याण - शीळ रोडवरील एसए टी वैद्यरत्न या कोविड रुग्णालयात घडली आहे.

कोविड रुग्णालयातील लिफ्ट कोसळून कोरोना रुग्णासह तिघे गंभीर जखमी

author img

By

Published : Apr 24, 2021, 12:39 PM IST

ठाणे - गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोविड रुग्णालयात आगीच्या घटनासह ऑक्सिजनची गळती सारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. अशीच एक दुदैवी घटना कल्याण - शीळ रोडवरील एसए टी वैद्यरत्न या कोविड रुग्णालयात घडली आहे. या रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये कोरोना रुग्ण व त्याचा नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचारी जात असतानाच अचानक लिफ्ट खाली कोसळली. यामध्ये रुग्णासह तिघे गंभीर जखमी झाले आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला व मोठा अनर्थ टळला.

अचानक लिफ्ट तळ मजल्यावर कोसळली-

डोंबिवली मधील कल्याण - शीळ रोड येथील एस एस टी वैद्यरत्न हे कोव्हीड रुग्णालय आहे. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आशा महाजन (43), दिलीप महाजन (56) हे दाम्पत्य आपल्या मुलाला उपचारासाठी या रुग्णालयात घेऊन आले. त्यावेळी आशा नारकर या रुग्णालयीन महिला कर्मचाऱ्यासह तिघे जण लिफ्ट मधून पहिल्या मजल्यावर जात होते. त्यावेळी पहिल्या मजल्यावर लिफ्ट अडकली त्यामुळे लिफ्टमधील सर्वजण घाबरले. लिफ्टचा दरवाजा उघडत असताना अचानक लिफ्ट तळ मजल्यावर जोरात कोसळली. या दुर्घटनेत लिफ्टमध्ये असलेल्या तिघा जणांना गंभीर दुखापत झालीय. तर महाजन यांच्या मुलाला दुखापत झाली असून त्याला याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या तिघांना उपचारासाठी डोंबिवली मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड-

रुग्णालय प्रशासनाकडून सदर लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली याबाबत देखभाल दुरुस्ती विभागाला कळवल आहे. या रुग्णांवर उपचाराचा संपूर्ण खर्च आम्ही करणार असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

हेही वाचा - नूथलपती वेंकट रमणा भारताचे नवे सर न्यायाधीश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.