ठाणे - पैशाच्या वादातून एकाचा खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह खाडीत फेकणाऱ्या त्रिकुटाला कळवा पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. केवळ टेलरमार्कवरून पोलिसांनी अवघ्या 12 तासांत तिघांच्या मुसक्या आवळल्या.
कळवा खाडीत 1 डिसेंबरला 30 ते 40 वय असलेल्या एखा पुरुषाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. मृतदेहाच्या शर्टावर 'सुंदर टेलर्स', असे टेलरमार्क होते. त्यावरुन पोलिसांनी मृताची ओळख पटवली. शेख मोहंमद आसीफ (वय 33 वर्षे, रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई), अशी त्याची ओळख निष्पन्न झाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांनी मोबाईलचा तांत्रिक तपस आणि विश्लेषण केले. यावरून आरोपी हे गोवंडीचे असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलिसांचे एक पथक गोवंडी येथे जाऊन तपास केल्यानंतर निशामुग्रीन इस्लाम मुझोन शेख(वय 44 वर्षे, रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) हा मुख्य आरोपी असून त्याच्या बहिणीला मृत शेख मोहम्मद आसिफ याने पैशाच्या वादातून ठार मारण्याची धमकी दिली होती. त्या रागातून निशामुग्रीन व त्याचे सहकारी मिर्झा अली नवाब(वय 30 वर्षे, शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई), मोहम्मद इरफान खान (वय 32 वर्षे, रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) यांच्या सहायाने पैसे देण्यासाठी बोलावून लाकडी बांबू तसेच हत्याराने गंभीर दुखापत करून ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचया हेतूने मृतदेहाला गोणीत टाकून खाडीत फेकले. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुलीही दिली आहे.
हे ही वाचा - Thane Viral Video : लग्न मंडपाला भीषण आग; तरीही पठ्ठ्या मारतो मटणावर ताव!