ETV Bharat / city

Theft Of Gold : दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघांंना अटक; ७१ तोळे दागिन्यांसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

१ किलो वजनाचे सोने चोरी ( Theft Of Gold ) करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला ( criminals ) मानपाडा पोलिसांनी अभिजित आलोक रॉय याला ( Manpada police arrested Abhijit Alok Roy) अटक केली आहे. त्याच्याकडून ३६ लाख रुपयाचे जवळपास ७१ तोळे सोने पोलिसांनी जप्त केले आहे.

Two thieves arrested
चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघांंना अटक
author img

By

Published : Jul 9, 2022, 3:38 PM IST

ठाणे - दिवसाढवळ्या घरफोडी करून १ किलो वजनाचे सोने चोरी ( Theft Of Gold ) करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मानपाडा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ३६ लाख रुपयाचे जवळपास ७१ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. मूळचा पश्चिम बंगालचा असणारा मुंबईतील कामाठीपुऱ्यात रहणारा गुन्हेगार अभिजित आलोक रॉय (३६) ( Manpada police arrested Abhijit Alok Roy) या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे अटक केली आहे.

सचिन गुंजाळ पोलीस उपआयुक्त यांची प्रतिक्रिया

म्हणून चोरीचा मार्ग स्वीकारला - सराईत गुन्हेगार अभिजित याने मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले ६ गुन्हे आणि टिळकनगर हद्दीत केलेला १ गुन्हा उघडकीस आला असून ७१ ग्रॅम सोने आणि २५८ ग्रॅम चांदी असा एकूण ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल मानपाडा पोलिसांनी हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या कामाठीपुऱ्यात आरोपी अभिजित हा लोकलने प्रवास करून डोंबिवली येत येऊन दिवसा चोऱ्या करत असे. ज्या इमारतीला वॉचमन नाही अशा इमारती हेरून त्यानंतर तो चोरी करत. तो स्वतः सुरुवातीला सोने गाळण्याच्या व्यवसायामध्ये होता. मात्र या व्यवसायात नुकसान झाल्याने त्याने दहा वर्षापासून सोने चोरीचा मार्ग स्वीकारला होता.

एकुण १० गुन्हे उघडकीस - तर दुसऱ्या गुन्ह्यात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधून टाळे फोडून भंगार चोरी करणाऱ्या इम्रान अबलेश खान (२५, रा. मानगांव, डोंबिवली), रियाज रमजान खान (३६, रा. भिवंडी) या दोघांना देखील घरफोडीच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडुन एक मोटार सायकल, दोन मोबाईल, कॉपर, पॉलीकॅब वायर, पितळी वॉल, गाडीचे सायलन्सर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींकडुन मानपाडा, टिळकनगर पोलीस ठाण्यामधील एकुण १० गुन्हे उघडकीस करण्यात आले असून तिन्ही आरोपीकडून आतापर्यत ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या पथकाने केली कामगिरी - मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश वनवे, सपोनि सुनिल तारमळे, यांच्यासह प्रशांत वानखेडे, राजेंद्र खिलारे, अशोक कोकोडे, सुशांत तांबे, संतोष वायकर, तारांचद सोनवणे, विजय कोळी, प्रविण किनरे, दिपक गडगे, भारत कांदळकर, महादेव पवार, यल्लप्पा पाटील, महेंद्र मंझा, शांताराम कसबे या पथकाने ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा - CM On Flood Situation : हिंगोलीतील पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून घेतला आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.