ठाणे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील सरकार बदलले आणि आता याच कारणामुळे शिवसेनेची ठाणे आणि ठाण्याची शिवसेना आता हे समीकरण बदलणार आहे Shiv Senas equation in Thane changed . शिवसेनेने ठाण्याची धुरा केदार दिघे आणि खासदार राजन विचारे यांच्याकडे सोपावली आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना रोखण्याचे काम राजन विचारे यांना करावे लागणार आहे Kedar Dighe and MP Rajan Vichare lead Shiv Sena in Thane .
महानगर पालिकेचे सत्ता समीकरन बदलणार शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे आणि जिल्ह्यातील अनेक महानगर पालिकेचे सत्ता समीकरण बदलणार आहे. ठाण्यात 30 वर्षांपासून ठाणे महानगर पालिकेवर Thane Municipal Corporation शिवसेनेचा झेंडा आहे आणि आता या सत्तेला धक्का मिळणार आहे. राज्यात शिंदे गट आणि भाजपची BJP सत्ता आहे पण ही युती ठाण्यात टिकेल का हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेससह NCP and Congress भाजप ठाण्यात विरोधात अस्तित्वात आहे. एकनाथ शिंदे गटांत ठाण्यातील अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे आता हीच मंडळी आपल्या प्रभागात पुन्हा जोरात कार्यरत झाले आहेत.
फक्त एक नगरसेवक उद्धव ठाकरे गटात शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यातील सर्वच्या सर्व नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र खासदार राजन विचारे यांच्या पत्नी यांनी शिंदे गटात प्रवेश केला नाही आणि यामुळेच ठाण्यात राजन विचारे आणि केदार दिघे यांना पालिकेत सत्ता मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
आनंद दिघे यांचे दोन्ही शिष्य आमने सामने स्वतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला राजन विचारे आणि एकनाथ शिंदे हे आमने सामने आले होते आणि यामुळे ठाण्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी योग्य ती खबर दारी घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार झाला नाही पण भविष्यात हे गट पुन्हा आमने सामने येणार आहेत तेव्हा पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा Monsoon Session शिवसेनेच्या ५५ आमदारांना उद्धव ठाकरे यांच्याकडून व्हिप जारी