ETV Bharat / city

अखेर ठाण्यातील 'त्या' बेपत्ता रुग्णाचा लागला शोध; मृतदेह दुसऱ्यांना सोपवल्याने झाला होता गोंधळ - ठाणे बेपत्ता रूग्ण शोध

ठाण्याच्या विशेष कोविड रुग्णालयातून एक 72 वर्षीय रूग्ण बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला होता. अखेर या रुग्णाचा शोध लागला असून बेपत्ता रुग्णाचे तीन दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह कोपरीतील दुसऱ्याच एका जिवंत रुग्णाच्या कुटुंबीयांना देण्यात आला. या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सावळा गोंधळ सुरू असल्याची चर्चा आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 8, 2020, 12:00 PM IST

ठाणे - महानगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. ठाण्यातील विशेष कोविड रुग्णालयातून एका रुग्णाचा मृतदेह दुसऱ्याच लोकांना सोपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 72 वर्षीय पॅरालिसीसच (अर्धांगवायू) झालेला व्यक्ती ठाण्याच्या कोविड रुग्णालयात दाखल होता. त्यांना एकट्याने चालताही येत नव्हते. मात्र, ते रुग्णालयातून गायब झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे होते. पोलिसांनी याबाबत मिसिंगची तक्रारही दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अखेर या रुग्णाचा शोध लागला आहे.

बेपत्ता रुग्णाच्या कुटुंबीयांची व्यथा जाणून देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर भाजपचे ठाणे प्रभारी किरीट सोमैया यांनी काल कापूरबावडी पोलीस ठाणे व कोविड रुग्णालयाच्या प्रशासनाला निवेदन देऊन रुग्णाचा ४८ तासात शोध घेण्याची आग्रही मागणी केली होती. आलेल्या दबावामुळे महानगरपालिका प्रशासनाने गायकवाड यांचा कसून शोध सुरू केला. व त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

बेपत्ता रुग्णाचे तीन दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यांचा मृतदेह कोपरीतील दुसऱ्याच एका जिवंत रुग्णाच्या कुटुंबियांना देण्यात आला. या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सावळा गोंधळ सुरू असल्याची चर्चा आहे. चकचकीत व उत्तम सजावटीचे रुग्णालय उभारण्याऐवजी किमान रुग्णांची सविस्तर माहिती असलेली नोंदवही ठेवली असती, तरी हा बाका प्रसंग टळला असता. कोविडच्या आपत्तीत रुग्णांचे नातेवाईक चिंतेत असतात. महापालिकेच्या अशा बेजबाबदार कारभारामुळे त्यांच्या भावनांशी खेळ केला जात असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.

ठाण्यातील ग्लोबल इम्पॅक्ट हबमध्ये सुरू केलेल्या कोविड -19 च्या रुग्णालयातून हा रुग्ण गायब झाल्याचा होता. 29 जूनला या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना बाळकुम येथील ग्लोबल इम्पॅक्ट या कोविड -19 च्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णासंदर्भात काहीही ही माहिती उपलब्ध न झाल्याने शेवटी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन विचारणा केली. त्यानंतर रुगणालय प्रशासनाने संपूर्ण रुग्णालय पालथे घातले. मात्र हा रूग्ण कुठे सापडला नव्हता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.