ETV Bharat / city

नविन प्रभाग रचनेचा कोपरीकरांकडून हरकत, दिला 'हा' इशारा

राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नविन प्रभाग रचना करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवर कोपरी येथील रहिवाशांनी हरकत उपस्थित केला असून केवळ राजकीय फायद्यासाठी कोपरीचे तुकडे करणाऱ्यांना कोपरीकर त्यांना त्यांची जागा देखवेल, असा इशाराही कोपरीकरांनी दिला आहे.

पोस्टर
पोस्टर
author img

By

Published : Feb 9, 2022, 9:06 PM IST

ठाणे - राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नविन प्रभाग रचना करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवर कोपरी येथील रहिवाशांनी हरकत उपस्थित केला असून केवळ राजकीय फायद्यासाठी कोपरीचे तुकडे करू पाहणाऱ्यांना कोपरीकर त्यांना त्यांची जागा देखवेल, असा इशाराही कोपरीकरांनी दिला आहे.

कोपरीकरांशी बातचित करताना प्रतिनिधी

नव्या प्रभाग रचनेनुसार कोपरीचे तीन तुकडे करण्यात आले असून ठाणे पूर्व कडील आनंद नगर, गांधी नगरचा भाग वागळे इस्टेट प्रभाग समितीला जोडला गेला असून कोळीवाड्याचा भाग नौपाडा प्रभाग समितीला जोडला जाणार आहे. यामुळे कोपरी प्रभाग समितीचे अस्तित्त्व धोक्यात येण्याची शक्यता कोपरीकरांकडून व्यक्त केली जात आहे. ठाणे महापालिकेतील प्रभाग रचने प्रमाणे कोपरी प्रभाग समिती अस्तित्वात आली. विकास व प्रभागाचा विस्तार यानुसार नगरसेवकांची संख्या वाढणे गरजेचे होते. मात्र, पूर्वी 9 नगरसेवकांची संख्या असलेल्या प्रभाग समिती केवळ चार नगरसेवकांवर मर्यादीत झाली होती. मात्रा, कोपरी प्रभाग समिती नष्टच होणार आहे. हे सर्व केवळ राजकीय फायद्यासाठी चालले आहे. मात्र, यामुळे कोपरीचा विकास मंदावत जाणार असून कोपरी प्रभाग समिती पूर्वीप्रमाणे करावी, अशी मागणी या निमित्ताने होत आहे.

कोपरी प्रभाग समिती नामशेष होण्याच्या मार्गावर - कोपरी प्रभाग समिती नष्ट करून नौपाडा प्रभाग ( Naupada ) समितीमध्ये वर्ग करण्यात आली व कोपरीचे पूर्ण अस्तित्त्वच संपवण्यात आले आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. कोपरीचे तुकडे करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांसाठी कोपरीकर कीती दीवस बांधले जाणार आहोत, असा सवाल उपस्थित करत आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shine ) हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. या मतदाराचे संघाचे नाव कोपरी पाचापाखाडी म्हणजेच आजची कोपरी उद्याची पाचपाखाडी होणार का, असा खोचक सवाल या निमित्ताने राजकीय मंडळींना या पोस्टारद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. आपण आपली ओळख अबाधीत ठेवायची की नाही, असा सवाल कोपरीच्या नागरिकांना उपस्थित करून कोपरी एकीकरण समितीने कोपरीचे विभाजन होण्यापासून टाळूण्यासाठी साथ द्या, असे आवाहनात्मक पोस्टर लावले आहे.

हेही वाचा - Cluster Development Project : ठाणेकरांना हक्काचे घर देणार -एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.