ETV Bharat / city

Cluster Development Project : ठाणेकरांना हक्काचे घर देणार -एकनाथ शिंदे - सर्वांना हक्काचे घर

शहरातील धोकादायक,अति धोकादायक इमारतींत राहणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचे आणि सुरक्षित घरकुल देण्याचं माझं स्वप्न असून (Cluster Development Project ) अत्यंत जिव्हाळ्याच्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या माध्यमातून ते पूर्ण होताना समाधान वाटत असल्याची भावना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

ठाणेकरांना हक्काचे घर देणार  -एकनाथ शिंदे

author img

By

Published : Feb 9, 2022, 10:50 AM IST

ठाणे - शहरातील धोकादायक,अति धोकादायक इमारतींत राहणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचे आणि सुरक्षित घरकुल देण्याचं माझं स्वप्न असून अत्यंत जिव्हाळ्याच्या (Eknath Shinde On Cluster Development Project ) महत्त्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या माध्यमातून ते पूर्ण होताना समाधान वाटत असल्याची भावना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. (Cluster Development Project ) ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने लोकमान्य नगर, कोरस रोडवरील सुविधा भूखंडावर शहरातील समूह विकास योजनेंतर्गत संक्रमण शिबीर इमारत बांधकामाच्या भूमीपुजन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

महानगरपालिका यांच्यात यापूर्वीच सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

शहरातील बेकायदा धोकादायक इमारतींत राहणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचे आणि सुरक्षित घरकुल देणाऱ्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. (Thanekar will be given a rightful home ) वागळे इस्टेट येथील क्लस्टर योजनेसाठी अंमलबजावणी यंत्रणा असलेली सिडको आणि ठाणे महानगरपालिका यांच्यात यापूर्वीच सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. लवकर या प्रकल्पाला गती मिळणार असून ही ठाण्यासाठी एक अभिमानाची बाब असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.

महत्त्वपूर्ण योजनेतील त्रुटी दूर करून योजनेला गती देण्यात आली

ठाण्यातील धोकादायक इमारतींत राहणाऱ्या लक्षावधी नागरिकांना त्यांच्या हक्काचे व सुरक्षित घर मिळावे यासाठी ठाण्यातील लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून लढा सुरु होता. या लढ्यातूनच हा भव्य प्रकल्प साकारत आहे. नगरविकास विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर लगेचच या महत्त्वपूर्ण योजनेतील त्रुटी दूर करून योजनेला गती देण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात किसननगर येथील क्लस्टर योजनेला सुरुवात होणार असल्याचेही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

धोकादायक इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकास न्याय देण्याचे काम

ठाणे शहरात एकूण १५०० हेक्टरहून अधिक जमिनीवर क्लस्टर योजना साकारत असून यात नागरिकांना स्वमालकीची, सुरक्षित घरे मिळण्याबरोबरच रुंद रस्ते, उद्याने, मैदाने, मूलभूत सोयीसुविधा, रोजगार केंद्रे,अर्बन फॉरेस्ट आदी वैशिष्ट्ये असणार आहेत. शहरातील धोकादायक अति धोकादायक इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकास न्याय देण्याचे काम करण्यात येणार असून अनेक वर्षांच स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याची भावना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार

काहीजण क्लस्टर योजनेचे गाजर असे फलक लावून टीका करतात. त्यांच्यावर टीका करायची नाही, त्यांना कामाच्या माध्यातून उत्तर द्यायचे आहे. इमारत झाल्यावर त्यांना नारळ फोडायला बोलवू, असा टोला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. तसेच नगरसेवक आणि आमदार नाहीत, तिथे उदार मनाने निधी दिला. विकासात कधीही राजकारण केले नाही. त्यामुळे वेळ येईल तेव्हा यावर परखडपणे बोलेन, असा इशारा त्यांनी राष्ट्रवादीला दिला. खड्डे नसलेले रस्ते, शुद्ध पाणी आणि इतर मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश त्यांनी पालिका प्रशासनाला यावेळी दिले.

हेही वाचा - Rahul Gandhi on Narendra Modi : काँग्रेस पक्षाच्या सत्य बोलण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले - राहुल गांधी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.