ठाणे : कमावणारा एकुलता एक मुलगा अचानक जेव्हा मृत्युमुखी पडतो तेव्हा त्या परिवारावर काय परिस्थिती ओढवते हे ठाण्यातील पवार परिवारावरून कळते. गेल्या पावसात यांच्या मुलाच्या अंगावर झाड कोसळून त्यात त्याचा मृत्यू झाला होता. आणि आर्थिकदृष्ट्या हा परिवार उघड्यावर पडलं होता, असे कोणत्याही परिवारासोबत होऊ नये. यासाठी ठाणे पालिकेने पावसापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी व धोकादायक झाडे पाडावी, अशी मागणी ठाण्यातून होऊ लागली आहे. त्यातच जवळपास ११० झाडे ही ठाण्यात अतिधोकादायक आहेत, असे धक्कादायक सत्य समोर आलेय.
झाडांंमुळे अपघात होऊन कुटुंबांवर आले संकट : ठाण्यातील पाचपाखडीमध्ये काही वर्षांपूर्वी व्यवसायाने वकील असलेले किशोर पवार यांचा झाड पडून मृत्यू झाला होता. या अपघातानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळदेखील आली होती. कारण किशोर हा एकमेव कमावता त्यांच्या घरामध्ये होता. पालिका प्रशासनाने केलेले हलगर्जी ही किशोरच्या जीवावर बेतली आणि आज त्यांच्या कुटुंबीयांना हलाखीचे दिवस काढावे लागत आहेत. आता पावसाळा येणार आहे. काही दिवसांत पावसाचे आगमन होईल, वारा पाऊस यामुळे वेडेवाकडे झाडे, कधीही कोसळू शकतात, प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी याचीदेखील गंभीरतेने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी आणि कोणाचाही जीव जाऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन किशोर पवार यांचे आई-वडील करीत आहेत.
पावसाळापूर्व महापालिकेने करायची कामे : पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाने जी कामं करायची असतात त्यामध्ये नालेसफाई, खड्डे बुजवणे यासोबत पाणीपुरवठ्याची योग्य ती पाइपलाइनची काळजी घेणे ही काम महत्त्वाचे असतात. त्यासोबत पालिका क्षेत्रात असलेल्या झाडांची छाटणीदेखील अत्यंत महत्त्वाचं काम असतं मात्र या कामाकडे प्रशासनाचा हलगर्जीपणा होत असल्यामुळे, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहेत. आतापर्यंत अशा घटनांमध्ये अनेकांचा जीव तर गेलाय सोबत दरवर्षी अनेक वाहनांचे नुकसानदेखील होते. यासाठी पालिकेने लवकरच अशा झाडांची छाटणी करावी, अशी मागणी ठाणेकरांनी केलीय. तर ठाण्यातील अनेक झाडे ही सिमेंट काँक्रिटच्या विळख्यात असल्याने, झाडांच्या मुळांची वाढ होत नाही. काही वेळेस ही झाडांची मुळंही गटारलगतच्या भिंतीत जातात, यामुळे झाडांची वाढ होत नाही आणि अशातच दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे सिमेंट काँक्रिटीकरण करताना झाडाच्या बाजूला पुरेशी जागा सोडण्यात यावी जेणेकरून मातीत पाण्याचा निचरा होऊन झाडांची वाढ चांगली होईल आणि झाड पडून दुर्घटना होणार नाही असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.
झाडांच्या समस्येबरोबर जीर्ण इमारतींची सुधारणा : झुकलेली झाड, काँक्रीटीकरण आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे रस्त्यावर चालताना कधी नागरिकांचा जीव जाईल हे सांगता येणार नाही कारण असे प्रकार अनेकदा ठाणे-मुंबईमध्ये पाहायला मिळालेले आहेत. यासाठी पालिकेने धोकादायक इमारतीसारख्या गंभीर समस्यांप्रमाणे झाड कोसळणे, या बाबींकडे पाहावे, अशीच इच्छा नागरिकांची आहे.
हेही वाचा : Pre-Monsoon Workload : राज्यातील तलाव, नदी-नाले, बंधारे गाळात; मान्सूनपूर्व कामांचा बोजवारा