ETV Bharat / city

ठाण्यातील मोदक महोत्सवाला गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद; सोन्याचा वर्ख लावलेल्या मोदकाने वेधले लक्ष - ठाण्यात सोन्याचा मोदक

ठाण्यातील प्रशांत कॉर्नर मिठाईचे दुकानात मोदक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात केवळ 575 रुपयांपासून सुरू होऊन तब्बल नऊ हजारांपर्यंतच्या मोदक गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. अर्धा किलो एक किलो ते तब्बल चार किलोपर्यंतचे मोदक या महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आले असून अंजीर, रोझ, ड्रायफ्रूट, मावा अशा अनेक प्रकारचे मोदक इथे पाहायला मिळत आहेत. यामध्ये हजारो रुपये किंमतीचे सोन्याचा वर्ख लावलेल्या मोदकांचाही समावेश आहे.

मोदक महोत्सव ठाणे
मोदक महोत्सव ठाणे
author img

By

Published : Sep 17, 2021, 12:34 PM IST

Updated : Sep 17, 2021, 12:55 PM IST

ठाणे - गणेशत्सोवा दरम्यान खाद्यपदार्थामध्ये चर्चा असते ती मोदकाची आणि मोदक म्हटलं की आपल्यासमोर उकडीच्या मोदकांनी भरलेले ताट येते. मात्र ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानाने आयोजित केलेल्याम मोदक महोत्सोवामध्ये खाद्यप्रेमींना मोदकाचे विविध प्रकार पाहण्याची संधी मिळाली आहे. या महोत्सवात सोन्याचा वर्ख लावलेल्या मोदकासह अनेक प्रकारचे मोदक गणेशभक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. अगदी 9 हजार रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतचे मोदक या ठिकाणी मिळत असून त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठाण्यातील मोदक महोत्सवाला उदंड प्रतिसाद
ठाण्यातील मोदक महोत्सवाला उदंड प्रतिसाद
सणासुदीचे दिवस आले की मिठाईची दुकाने अगणित प्रकारच्या मिठाईंनी भरून जातात. शेकडो प्रकारच्या मिठाई ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. त्यातच सध्या गणेशोत्सवाची सगळीकडे धुम असून गणेश फक्त बाप्पाला खुश करण्यासाठी विविध प्रकारचे मोदक त्याला अर्पण करत आहेत. गणेशभक्तांची ही आवड लक्षात घेऊन सदैव काहीतरी नवीन प्रयोग करणाऱ्या ठाण्यातील प्रशांत कॉर्नर मिठाईचे दुकानात मोदक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोन्याचा वर्ख लावलेल्या मोदकाने वेधले गणेश भक्तांचे लक्ष

सोन्याचा वर्ख लावलेल्या मोदकाची किंमत 9 हजार रुपये -

या महोत्सवात केवळ 575 रुपयांपासून सुरू होऊन तब्बल नऊ हजारांपर्यंतच्या मोदक गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. अर्धा किलो एक किलो ते तब्बल चार किलोपर्यंतचे मोदक या महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आले असून अंजीर, रोझ, ड्रायफ्रूट, मावा अशा अनेक प्रकारचे मोदक इथे पाहायला मिळत आहेत. सात हजार ते नऊ हजार रुपयांच्या मोदकांवर शुद्ध सोन्याचा वर्ख लावण्यात आल्याची माहिती दुकानाचे व्यवस्थापक प्रमोद बापट यांनी दिली.

ठाण्यातील मोदक महोत्सवाला उदंड प्रतिसाद
ठाण्यातील मोदक महोत्सवाला उदंड प्रतिसाद

'प्रशांत कॉर्नर मध्ये आपण नेहमीच ग्राहकांना त्यांच्या आवडी चहा मिठाई उपलब्ध करून देत असतो, नवनवीन आणि आकर्षक मिठाई ग्राहकांच्या पसंतीस उतरत असतात', असे त्यांनी सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याचा वर्ख लावून मोदकांची विक्री करणारे बहुधा आपण एकमेव मिठाईचे दुकानदार असल्याची माहिती बापट यांनी मोठ्या अभिमानाने दिली. गतवर्षी दिवाळीच्या काळात देखील तब्बल 15 हजार रुपये किलो दराची मिठाई आपण ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती, त्याला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला, असेही त्यांनी सांगितले.

ठाणे शहरात अनेक ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रतीची मिठाई मिळते. परंतु प्रशांत कॉर्नर या दुकानात जी व्हरायटी मिळते, किंवा जी विविधता मिठाईमध्ये दिसून येते ती इतरत्र दिसत नाहीत. त्यामुळे आपण सणासुदीचे किंवा इतरही वेळी याच दुकानातून मिठाई खरेदी करतो, असे मनोगत या ठिकाणी आलेल्या ग्राहकांनी व्यक्त केले.

ठाण्यातील मोदक महोत्सवाला उदंड प्रतिसाद
ठाण्यातील मोदक महोत्सवाला उदंड प्रतिसाद
मागील वर्षी विकली होती 22 हजार रुपये किलोची मिठाई-मागील वर्षी याच ठिकाणी अस्सल ड्राय फ्रुट आणि महागड्या पदार्थांच्या सोबत बनवलेली 22 हजार रुपये किलो रुपयांची मिठाई ठाण्यात मोठा चर्चेचा विषय झाली होती. ती मिठाई ग्राहकांच्या पसंतीला देखील पडली होती. त्यानंतर आता सोन्याचा वर्ख लावलेल्या मोदकामुळे आता मिठाई हा विषय ठाण्यात पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
सोन्याचा वर्ख असलेल्या मोदकाने गणेश भक्तांचे वेधले लक्ष

हेही वाचा - VIDEO : आज लाडक्या बाप्पासाठी झटपट 'असे' तयार करा 'पेढा मोदक'

हेही वाचा - वसईत बाप्पासोबत लाखो रुपयांच्या मुकूटाचंही पाण्यात विसर्जन; वाचा पुढे काय घडलं

Last Updated : Sep 17, 2021, 12:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.