ठाणे शहरात गेले काही दिवस पावसाचा जोर वाढलेला असून या ( Thane roads issue ) पावसामुळे ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून गणपती पूर्वी केलेल्या रस्त्यांची डागडुजी अवस्था जैसे थे झाली ( Thane corporation administration negligence ) आहे. गणपती उत्सव जसा पार पडला तसे ठाणे शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
पडलेल्यामुळे खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिकांना तसेच ठाण्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास ( Thane road issue after Festival ) होत आहे. याच खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या खड्ड्यांमुळे ठाण्यातील नागरिकांचे जीव देखील गेलेले आहेत. तरीसुद्धा प्रशासनाला अजूनही जाग येत नसल्याने प्रशासनाने नागरिकांना वेठीस धरले आहे का असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे.
खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीवदेखील गेलेले ठाणे शहरात प्रचंड मोठे खड्डे पडले असून ठाण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणारे तसेच ठाणे घोडबंदर व ठाणे कडून मुंबईच्या दिशेने जाणारे अनेक रस्ते हे खड्डेमय झालेले आहे. याच खड्ड्यातून वाट काढत अनेक वेळा नागरिकांना आपला प्रवास करावा लागतो तर या खड्ड्यांमुळे आजवर ठाणे शहरात अनेक नागरिकांचे जीवदेखील गेलेले आहेत. गणपतीपूर्वी हे खड्डे काही प्रमाणात भरले गेले होते परंतु थोड्याशा पडणारा पावसामुळे परत खड्डे तयार झाले आहेत.
खड्ड्यामुळे दोन जणांचा गेला जीव- ठाणेकर नागरिक आपल्या कमाईतून कर भरत असतो. याकरस्वरूपी येणाऱ्या पैशातून तरी ठाणे शहरातील रस्ते दुरुस्त करून ठाणेकरांना योग्य मार्ग देण्यात यावा अशी विनंती यावेळी ठाणेकर नागरिकांनी केलेले आहे तर आतापर्यंत दोन जणांचा या खड्ड्यांमध्ये जीव गेला आहे. आणखीन नागरिकांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का असा सवाल नागरिकांनी यावेळी उपस्थित केला आहे.
खासदारांनी पोलिसांवर काढला राग ठाण्याचे खासदार राजन विचारे हे आज रस्त्यांच्या पाहणीसाठी कोपरी परिसरात फिरत होते त्यावेळी कोपरीच्या पुलावर पडलेल्या खड्ड्यातून झालेल्या युवकाच्या मृत्यू बाबत राजन विचारे यांनी कोपरी पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी यांना चांगलेच सुनावले खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूनंतर अपघातात खड्ड्यांचा उल्लेख नसल्यामुळे राजन विचारे हे भलते चिडले होते त्यांनी कोपरीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना चांगले झापले आणि आरोपींना याबाबतीत कसा लगेच जामीन मिळाला असा सवालदेखील विचारला.