ठाणे - भारतीय सरकार वारंवार इस्लाम धर्मीयांसाठी अडचणी निर्माण करता, मुस्लिमांच्या सहनशीलतेचा अंत बघता लवकरात लवकर संपूर्ण जगभरातील मुस्लिमांची माफी मागा नाही तर आम्ही गप्प बसणार नाही, असा धमकीवजा इशारा चक्क ठाणे पोलिसांच्या वेबसाइटवरुन देण्यात आला आहे. एका हॅकरने चक्क ठाणे पोलिसांची वेबसाइट हॅक केली आणि इशारा दिला आहे.
वेबसाईट हॅकर्सने दिल्याने एकच खळबळ उडाली - भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे पडसाद दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. वादग्रस्त वक्तव्यानंतर वेबसाईट हॅकिंगचे प्रकार वाढले आहेत. द्वेषपूर्ण हॅकिंगचा फटका ठाणे पोलिसांनाही बसला आणि सायबर सेल कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. पोलिसांची वेबसाइट सुरू केल्यानंतर स्क्रीनवर 'हॅक्ड बाय बाय वन हॅट सायबर टीम', असे लिहिलेले समोर येत आहे. यामुळे ठाणे सायबर सेल हॅकर्सचा शोध घेत आहेत. दुसरीकडे मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधानानंतर गुन्हे दाखल करण्यासाठी देशात आंदोलने करण्यात येत आहे तर जगभरातीाल मुस्लीम राष्ट्रांनी याची दखल घेतली.
हॅकर्सचा शोध घेण्याचे आव्हा - नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता अटकेच्या मागणीसाठी मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. त्यात पोलीस राजकीय दबाब असल्याने अटक करण्यात कानाडोळा करीत आहेत. त्याचाच द्वेष म्हणून हॅकर्सने आम्ही काहीही करू शकतो याचा प्रत्यय देण्यासाठी ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक करण्यात आली, असावी असा संशय व्यक्त होत आहे. नुपूर शर्मावर ठाण्याच्या मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अटक करण्यासाठी टाळाटाळ होत असून केवळ इमेलवर समन्स बजावण्यात आले. म्हणून निषेध नोंदवित ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केली असावी, असा संशयही आहे. ठाणे सायबर सेलसाठी हॅकर्सचे शोध घेणे व त्याचा अटक करणे हे आव्हान आहे.
हेही वाचा - Nupur Sharma : नुपूर शर्माच्या वकिलांचा भिवंडी पोलिसांना ई-मेल; हजर राहण्यास मागितली मुद्दत