ETV Bharat / city

ईव्हीएम हॅकिंगच्या व्हायरल व्हीडीओमुळे ठाण्यात खळबळ; हॅकरसह एकावर गुन्हा दाखल - Thane police Filed a case against hacker

हॅकर कशा प्रकारे हॅकिंग करतो याची कायदेशीर चौकशी झाली पाहिजे, यासाठी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस व निवडणूक आयोगाकडे आमदार गायकवाड यांनी चौकशीची मागणी केली आहे. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे.

ईव्हीएम
ईव्हीएम
author img

By

Published : Aug 19, 2021, 10:27 PM IST

Updated : Aug 19, 2021, 10:49 PM IST

ठाणे - सोशल मीडियावर ईव्हीएम मशीन हॅकरच्या व्हायरल व्हीडीओमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅकिंग करण्याचा व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या तक्रारीवरून हॅकर आशिष चौधरीसह व्हिडीओ काढून व्हायरल करणाऱ्या गौतम वाघवर कोळसेवाडीत फसवणुकीचा (420) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल व्हीडीओमध्ये उल्हासनगर परिसरात राहणारा आशिष चौधरी नावाचा व्यक्ती दिसत आहे. त्याने कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गायकवाड यांच्या मुलाला सॉफ्टवेअर बनवून देतो म्हणून लाखोचा गंडा घातला होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आशिष चौधरी यांच्या मते ईव्हीएम मशीन हॅकिंग करत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांचा विजय निश्चित होता. मात्र, मी EVM मशीन हँक करून मशिन मधल्या मतामध्ये उलटफेर करून चक्क साडेबारा हजाराने भाजप आमदार गणपत गायकवाड यांना विजय केल्याचा दावा आशिष चौधरी केला आहे.

ईव्हीएम हॅकिंगच्या व्हायरल व्हीडीओमुळे ठाण्यात खळबळ

हेही वाचा-राज्यात ५ हजार २२५ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, १५४ मृत्यू

आमदार गणपत गायकवाड यांची तक्रार दाखल-

आमदार गणपत गायकवाड यांनी आपला त्या व्यक्तीशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत वायरल व्हिडीओवर आश्चर्य व्यक्त केले. नक्की हा हॅकर कशा प्रकारे हॅकिंग करतो याची कायदेशीर चौकशी झाली पाहिजे, यासाठी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस व निवडणूक आयोगाकडे आमदार गायकवाड यांनी चौकशीची मागणी केली आहे. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या तक्रारीवरून हॅकर आशिष चौधरीसह व्हिडीओ काढून व्हायरल करणाऱ्या गौतम वाघवर 420 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-नारायण राणेंनी अभिवादन केल्यानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण

व्हायरल व्हीडीओमध्ये दावा किती खोटा किती खरा ..
याबाबत शिवसेनेचे पराभूत उमेदवार धनंजय बोराडे यांनीही अशा प्रकारे हॅकिंग होत असेल, तर निवडणूक यंत्रणेवरील कमकाजावर प्रश्न उपस्थित होत केले आहेत. याबाबत गंभीर दखल घेत संबंधित हॅकरला व आरोप केले यांची सीआयडी मार्फत तसेच निवडणूक आयोगामार्फत चौकशी व्हावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. तर याप्रकरणात पोलीस व संबंधित शासकीय अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे नेमके हॅकरने व्हायरल व्हिडिओमध्ये केलेला दावा किती खोटा किती खरा हे तर पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांच्या चौकशीअंती समोर येणार आहे. दुसरीकडे या गंभीर प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा-दिशाहीन तालिबान सैरभैर! सरकार चालविण्यासाठी माजी अधिकाऱ्यांसमोर तालिबानचे आर्जव!

दरम्यान, ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा होत असल्याचे आरोप विविध विरोधी पक्षांनी आजवर केले आहेत. निवडणूक आयोगाने हे आरोप सिद्ध करण्याचे आव्हान देऊनही एकाही पक्षाने ईव्हीएम हॅकिंगचे प्रात्याक्षिक करून दाखविलेले नाही.

Last Updated : Aug 19, 2021, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.