ETV Bharat / city

ठाण्यात दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; पोलीस करताहेत जनजागृती

author img

By

Published : Nov 8, 2020, 4:54 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र, दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन करत नाहीत. मास्क आणि सोशल डिस्टन्सचे पालन होत नसल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

thane police doing awareness work in markets
बाजारपेठ

ठाणे - कोरोनाने संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशातच दिवाळी तोंडावर असल्याने खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत आहे. वाढती गर्दी नियंत्रणात ठेवण्याचे पोलीस आणि प्रशासनासमोर आव्हान आहे. ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र, दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन करत नाहीत. मास्क आणि सोशल डिस्टन्सचे पालन होत नसल्याने कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिनी पाटील या हातात मेगाफोन घेऊन बाजारात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना ठराविक अंतर पाळण्याचे आणि मास्क घालण्याचे आवाहन करत आहेत. पोलिसांच्या या आवाहनाला नागरिक चांगला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पोलिसांचा बंदोबस्त वाढला-

दिवाळीमुळे बाजारपेठा गर्दीने गच्च भरल्या आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात चोरांवर लक्ष ठेवणाऱ्या पोलिसांना आता सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आणि मास्क घालण्याचे आवाहन करावे लागत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.