ठाणे : पत्नी रुग्णालयात उपचार घेत असून त्यासाठी पैशाची गरज असल्याचे भावनिक कारण सांगत नकली सोनसाखळी देऊन सोनाराला एक लाख ४० हजार रुपयांला गंडा घातल्याची घटना घडली आहे. ही घटना बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात (Badlapur Railway Station) असलेल्या एका सोने चांदी विक्रीच्या दुकानात घडली आहे. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात (Badlapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अंबरनाथमधून अटक करण्यात आली आहे. महेश रतीलाल हजारे असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे.
Thane Crime : नकली सोनसाखळी विक्री करून सोनाराला गंडा घालणारा भामटा गजाआड - Badlapur Police Station
पैशाची गरज असल्याचे सांगत दुकानदाराला खोटी चेन देत एक लाखाचे पैसे लंपास करणाऱ्या सोनाराला बदलापूर पोलीसांनी (Badlapur Police Station) अटक केली आहे. महेश रतीलाल हजारे असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे.
![Thane Crime : नकली सोनसाखळी विक्री करून सोनाराला गंडा घालणारा भामटा गजाआड Thane Crime](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14325159-305-14325159-1643556040369.jpg?imwidth=3840)
Thane Crime
ठाणे : पत्नी रुग्णालयात उपचार घेत असून त्यासाठी पैशाची गरज असल्याचे भावनिक कारण सांगत नकली सोनसाखळी देऊन सोनाराला एक लाख ४० हजार रुपयांला गंडा घातल्याची घटना घडली आहे. ही घटना बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात (Badlapur Railway Station) असलेल्या एका सोने चांदी विक्रीच्या दुकानात घडली आहे. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात (Badlapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अंबरनाथमधून अटक करण्यात आली आहे. महेश रतीलाल हजारे असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिली माहिती
बदलापूर रेल्वे स्टेशन जवळ जयेश जैन यांचे महेश ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानात एक अनोळखी इसम आला. त्याने माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मला पैशांची अत्यंत गरज आहे असं भावनिक कारण सांगत नकली सोनसाखळी खरी असल्याचे भासवत जयेश यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यानंतर जयेश यांना नकली सोनसाखळी देऊन त्याबदल्यात जयेश यांच्या कडून एक लाख ४० हजार रुपये घेऊन काही क्षणातच भामटा पसार झाला. मात्र, तो गेल्या नंतर सोनसाखळीची सत्यतेबाबत यांनी पाठपुरावा केला असता ती सोनसाखळी नकली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बदलापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्या भामट्या विरोधात तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही फुटेजमुळे पटली भामट्याची ओळख
बदलापूर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे आणि गुप्त बातमीदारामार्फत या भामट्याची माहिती घेतली असता तो अंबरनाथ पश्चिम येथील भेंडीपाडा परिसरात राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून महेश हजारे याला अटक केली आहे. त्याच्याकडून सोनाराची रक्कम ताब्यात घेतले आहे. या भामट्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.