ETV Bharat / city

Action Against Without Mask Thane : विनामास्क फिरणाऱ्यांनो सावधान.. पालिका आणि पोलीस प्रशासन कारवाईस सज्ज..

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने ( Maharashtra Covid Restrictions ) घालून दिलेल्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यास ठाणे महापालिका ( Thane Municipal Corporation ) व पोलिसांनी ( Thane Police ) सुरुवात केली आहे. त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत ( Action Against Without Mask Thane ) आहे.

पालिका आणि पोलीस प्रशासन कारवाई
पालिका आणि पोलीस प्रशासन कारवाई
author img

By

Published : Jan 11, 2022, 5:00 AM IST

ठाणे : ठाणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने कहर केला असून, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली ( Maharashtra Covid Guidelines ) आहे. ज्यात नागरिक आणि आस्थापना यांच्यासाठी मार्गदर्शक तत्व दिली ( Maharashtra Covid Restrictions ) आहेत. नियमबाह्य वर्तन करणाऱ्या नागरिक आणि आस्थापनांवार कारवाई करण्यासाठी पोलीस ( Thane Police ) आणि महापालिका ( Thane Municipal Corporation ) प्रशासन सज्ज झाले असून, प्रत्येक प्रभागात गस्त सुरु झाली आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांनो सावधान.. पालिका आणि पोलीस प्रशासन कारवाईस सज्ज..

नागरिकांवर होतेय कारवाई

नुसत्या गस्तीवर प्रशासन थांबले नसून, दंड आकारून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई देखील होत ( Action Against Without Mask Thane ) आहे.आज ठाणे स्टेशन परिसरात फिरून पालिका अधिकारी आणि पोलिसांनी ध्वनीक्षेपकावरून उद्घोषणा करून सर्वांना नियम पाळण्याचे आवाहन केले. सर्वांनी मास्क वापरावेत, सॅनिटाइजरचा वापर करा व सुरक्षित अंतर ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

.. तर आस्थापनांवर कारवाई

नियम मोडणाऱ्या आस्थापनांना आधी कडक इशारा देण्यात येईल. त्यानंतरही नियमबाह्य वर्तन झाल्यास आस्थापना सील देखील करण्यात येईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला. राज्य सरकारने सर्व खासगी आस्थापनांना 50 टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जर 50 टक्के पेक्षा जास्त हजेरी असेल तर दंड आकाराने आणि आस्थापना सील करण्यासारख्या कारवाया पालिका प्रशासन पोलिसांच्या मदतीने करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.