ठाणे - ठाण्यात कोरोना वाढत असताना पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. डॉ. विपीन शर्मा यांना ठाण्यातीलच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची तब्बेत स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुक्त शर्मा यांनी अनेक बैठकांना उपस्थित होते, तसेच मागील आठवड्यात मंत्रालयात देखील कोरोना संदर्भात बैठकीला शर्मा यांनी हजेरी लावली होती.
डॉ. विपीन शर्मा यांची मागच्या वर्षी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात शर्मा हे रस्त्यावर उतरून काम केले होते. अनेक महिन्यांपासून डॉ. शर्मा यांनी पालिका आधिकरी आणि लोकप्रतिनिधींसमवेत कोरोनाला आळा घालण्यासाठी काम केले. मात्र, आता त्यांना थोडा त्रास जाणवला होता, त्यांनतर त्यांनी चाचणी केली असता कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.
लस घेऊनही झाली लागण
काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांनी लसीकरण करून पहिली मात्रा घेतली होती. त्यानंतर शासनाच्या आदेशाने काही दिवसांच्या फरकानंतर दुसरी मात्राही घेण्यात येणार होती. मात्र, धावपळ आणि शासकीय कामांमुळे अनेकांच्या संपर्कात आल्याने त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संबंधित डॉक्टरांनी आयुक्त शर्मा यांना आराम करण्याचा सल्ला दिला असून लवकरच शर्मा बरे होऊन पुन्हा आपल्या कामाला लागतील, असे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
खासगी रुग्णालय वादात
ठाण्यात खासगी रुग्णालये वादात असून या याधी अनेक 'व्हीआईपी ज्युपिटर' रुग्णालयात उपचार घेऊन गेले आहेत. त्यात राजकारणी सीने कलावंत यांचा समावेश आहे, शहरातील सर्वात मोठ्या आणि खासगी अशा या रुग्णालयाला कोविड मान्यता नाही, मात्र तरीही तिथे उपचार सुरू असल्याने सरकारी नियमांची खुलेआम पायमल्ली झालेली पाहायला मिळत आहे.
ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मांना कोरोनाची लागण
डॉ. विपीन शर्मा यांना ठाण्यातीलच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची तब्बेत स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुक्त शर्मा यांनी अनेक बैठकांना उपस्थित होते, तसेच मागील आठवड्यात मंत्रालयात देखील कोरोना संदर्भात बैठकीला शर्मा यांनी हजेरी लावली होती.