ठाणे - घरगुती वाद वाढल्याने पती- पत्नीने विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, विभक्त राहण्याचा परिणाम मुलाला भोगावा लागला आहे. मुलगा आपल्याकडे राहावा म्हणून जल्लाद बापाने मुलाला सिगारेटने चटके देऊन जखमी केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना ( Thane Crime )भिवंडीतील शांतीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी ( Thane Police ) तपास सुरु केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपी - आरोपी फहीम रिजवान अहमद खान व सनानुर हे दोघे नात्याने नवरा- बायको असून त्यांच्यात गेल्या काही महिन्यापासून घरगुती वाद वाढल्याने ते विभक्त होऊन राहत होते. या दोघांना एक मुलगा असून तो आई सनानुरकडे राहत आहे. ( Thane Crime ) दरम्यान आरोपी बापाने काही दिवसांसाठी मुलास आपल्याकडे राहण्यास घेऊन आला होता. मात्र त्यानंतर २० जुलै ते २५ जुलै दरम्यान मुलगा पुन्हा आईकडे माघारी जाऊ नये, यासाठी मुलाच्या मनात दहशत निर्माण करत असतं.
मुलाच्या हातावर व अंगावर सिगरेटचे चटके- आरोपी बापाने मुलाच्या हातावर व अंगावर सिगरेटचे ठिकठिकाणी चटके देऊन त्याला जखमी केले आहे. या याप्रकरणी मुलाची आई सनानुर हिने नवऱ्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ( Thane Crime ) त्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलाला जाणीवपूर्वक दुखापत करून जखमी केल्याचा गुन्हा दाखल करून जल्लाद बापाचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा - Umesh Kolhe Murder case : उमेश कोल्हे खूनातील आरोपीला आर्थर रोड कारागृहात मारहाण