ETV Bharat / city

Thane Crime Branch Seized Drags : ठाण्यात नायजेरियनला अटक; करोडो रुपयांच्या कोकेनसह 6 मोबाईल फोन जप्त - ठाण्यात ड्रग्ज स्पलाय करणारा अटक

ठाणे गुन्हे शाखेने एका नायजेरियनला अटक करून त्याच्याकडील 274 ग्राम कोकेन जप्त ( Thane Crime Branch Seized Drags ) केले आहे. त्यासोबत 6 मोबाईल फोन एक कार असा 1 कोटी 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Thane Crime Branch Seized Drags
ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी
author img

By

Published : Jan 31, 2022, 2:31 PM IST

Updated : Jan 31, 2022, 5:21 PM IST

ठाणे - ठाणे गुन्हे शाखेने एका नायजेरियनला अटक करून त्याच्याकडील 274 ग्राम कोकेन जप्त ( Thane Crime Branch Seized Drags ) केले आहे. त्यासोबत 6 मोबाईल फोन एक कार असा 1 कोटी 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांची प्रतिक्रिया

१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी -

ठाण्याच्या कासारवडवली परिसरात कोकेन आणि एमडीची विक्री करण्यासाठी एक आरोपी येणार असल्याची विश्वसनीय माहिती गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाला मिळाली. पोलीस पथकाने घोडबंदर रोडवरील द बाईक सुरज प्लाझा हॉटेलसमोर आनंदनगर नाका येथे सापळा रचुन एका नायजेरियन आरोपीला १ कोटी १२ लाख रुपयांच्या कोकेन-एमडी 6 मोबाईल फोनसह अटक केली. त्याच्याविरोधात कासार वडवली पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयाने १ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

१ कोटी १७ लाखांचा मुद्देमाल जप्त -

अटक आरोपी डिक्सन चिडीबेरे इझे (३०) रा. ओमसाई एस.आर.ए. संस्था संघर्षनगर, चांदीवली, मुंबई-७२ हा अमली पदार्थ कोकेन-२७४ ग्राम आणि ६० ग्राम एमडी पावडर घेऊन कासारवडवली आनंदनगर परिसरात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके याना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने घोडबंदर रोडवरील द बाईक सुरज प्लाझा हॉटेलसमोर आनंदनगर नाका येथे सापळा रचून संशयास्पद आरोपीला जेरबंद केले. अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडून २७४ ग्रॉम कोकेन आणि ६० ग्रॉम एमडी असा एकूण १ कोटी १२ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ आढळले. पोलीस पथकाने त्याला अमली पदार्थासह अटक केली. पोलिसांनी आरोपी इझे ज्या गाडीतून आला ती हुंदाई आय-२०, ६ मोबाईल, एक इलेक्ट्रॉनिक काटा हस्तगत केला. पोलीस पथकाने अमली पदार्थ आणि साहित्यासह १ कोटी १७ लाख ३८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आरोपीवर यापूर्वीही मुंबईत आहे गुन्हा दाखल -

आरोपी डिक्सन चिडीबेरे इझे यांच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीकडे रिपब्लिक ऑफ नायजेरिया देशाचा पासपोर्ट आढळला. त्याने 'हे' अमली पदार्थ हे नायजेरियन देशातून आणला असून त्याने मुंबई ठाणे येथे अनेकांना हे अमली पदार्थ विकल्याचे माहिती पोलिसांना होती आणि चौकशीत निष्पन्न झाले. सादर आरोपीला न्यायालयात नेले असता त्याला १ फेब्रुवारी रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सादर आरोपीवर यापूर्वी एक गुन्हा गुन्हे शाखा युनिट-१० मुंबई येथे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र या गुन्ह्यात तो जामिनावर होता. त्यानंतर पुन्हा आता ठाणे गुन्हे शाखेने अटक करून दुसरा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

बिजनेस विजावर आला होता भारतात -

आरोपी डिक्सन चिडीबेरे इझे हा भारतात व्यावसायिक कारणाने आला होता तसा विजा ही त्याने घेतला होता आता पोलीस त्याच्या मोबाईल चा तांत्रिक तपास करून त्याच्या ग्राहकांचा आणि कोकेनच्या उगम स्थानकाचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - Student Agitation VIDEO : शिक्षण मंत्र्यांच्या घरावर विद्यार्थ्यांचे वादळ; ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Last Updated : Jan 31, 2022, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.