ETV Bharat / city

खिशातून पैसे काढल्याच्या रागातून मित्राची हत्या, आरोपीला जन्मठेप - ठाणे न्यायालय आरोपीस जन्मठेप बातमी

ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी आले होते. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील संध्या मोरे यांनी न्यायालयात या प्रकरणी तब्बल १२ साक्षीदार तपासले. दरम्यान या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष महत्वाची ठरली.

thane court sentenced life imprisonment for accused to murder of a friend
आरोपीला जन्मठेप
author img

By

Published : Aug 9, 2021, 9:17 PM IST

ठाणे - आपल्या मित्रानेच खिशातून ४०० रुपयांची रक्कम काढल्याचा राग मनात धरून मित्राची हत्या करणाऱ्या आरोपी अन्सार अब्दुल खान(३४) याला हत्येप्रकरणी दोषी ठरवीत ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सदरची घटना नवीमुंबईच्या तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुलाखाली तीन वर्षांपूर्वी घडली होती.

डोक्यात दगड मारून हत्या
मृत शफिक रफिक शेख आणि अन्सार अब्दुल खान हे दोघे मित्र आहेत. तर मृत हा तुर्भे पुलाखाली राहण्यास होता. शफिक याने १२ जुलै २०१८ रोजी अन्सार याच्या खिशातून ४०० रुपये काढले. याची माहिती अन्सार याला मिळताच त्याने दुसऱ्या दिवशी झोपेत असलेल्या शफिकच्या डोक्यात मोठा दगड मारून हत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शफिक हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सानपाडा पोलीस ठाण्यात आरोपी अन्सार अब्दुल खान याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान १४ जुलै रोजी उपचाहरदरम्यान शफीत याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी दाखल गुन्ह्याचे परिवर्तन करीत हत्येचा गुन्हा दाखल केला.

सबळ पुराव्यामुळे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

सदर प्रकरण ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी आले होते. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील संध्या मोरे यांनी न्यायालयात या प्रकरणी तब्बल १२ साक्षीदार तपासले. दरम्यान या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष महत्वाची ठरली. न्यायमूर्ती ताम्हणेकर यांनी न्यायालयासमोर सादर सर्व साक्षी पुरावे आणि परिस्थितीजन्य पुरावे, सरकारी वकिलांचा युक्तीवाद पाहून सबळ पुराव्यामुळे आरोपी अन्सार अब्दुल खान याला दोषी ठरवीत जन्मठेपेची शिक्षा आणि एक हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.