ETV Bharat / city

उल्हासनगरात भाजपाला खिंडार! 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश - जितेंद्र आव्हाड लेटेस्ट न्यूज

तीन दिवसनपूर्वी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी कलानी कुटुंबीयांची भेट घेतली होती. यानंतर टीम ओमी कलानीसह भाजपाचे सुमारे २१ नगरसेवक, १९ माजी नगरसेवक, वरप, कांबाचे सरपंच, म्हारळचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशा सुमारे ११४ जणांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

ठाणे नगरसेवक राष्ट्रवादी
ठाणे नगरसेवक राष्ट्रवादी
author img

By

Published : Oct 27, 2021, 4:49 PM IST

ठाणे - ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय खलबतांनंतर उल्हासनगरमधील भाजपा नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत. आज 21 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हे सर्व नगरसेवक पप्पू कलानी गटाचे आहेत. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा हॉलमध्ये सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. त्यानंतर उल्हासनगर शहर भाजपाच्या अध्यक्षपदी ओमी कलानी यांच्या पत्नी पंचम कलानी यांची निवड करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. कांबाच्या संरपच यांच्यासह वरप आणि म्हारळच्या उपसरपंच व सदस्यांनीही राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला तर आरपीआय व पीआरपीच्या प्रत्येकी एक नगरसेवकाने प्रवेश केला.

हेही वाचा - म्हाडाने तळीये गावातील घरांची पुनर्बांधणी कालमर्यादेत करण्याचे गृहनिर्माणमंत्र्यांचे निर्देश

3 दिवसांपूर्वी घेतली होती भेट

तीन दिवसनपूर्वी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी कलानी कुटुंबीयांची भेट घेतली होती. यानंतर टीम ओमी कलानीसह भाजपाचे सुमारे २१ नगरसेवक, १९ माजी नगरसेवक, वरप, कांबाचे सरपंच, म्हारळचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशा सुमारे ११४ जणांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

हे नगरसेवक राष्ट्रवादीत

भाजपामधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये पंचम ओमी कलानी, डिंपल ठाकूर नगरसेविका तथा सभापती सार्वजनिक बांधकाम विभाग, शुभांगी निकम नगरसेविका, दिपा पंजाबी टिपीडी चेअरमन तथा नगरसेविका, छाया चक्र वर्ती - सभापती प्रभाग समिती २ तथा नगरसेविका, छाया चक्र वर्ती - सभापती प्रभाग समिती २ तथा नगरसेविका, हरेश जग्यासी सभापती - प्रभाग समिती १ तथा नगरसेवक, कविता गायकवाड, महसूल सभापती तथा नगरसेविका, दिप्ती दुधानी, सभापती प्रभाग समतिी ३ तथा नगरसेविका, दिनेश लिहरानी परिवहन समिती सभापती, रेखा ठाकूर – नगरसेविका, सरोज टेकचंदानी नगरसेविका, आशा भिराडे नगरसेविका, सविता तोरणो-रगडे - नगरसेविका, रवींद्र बागुल नगरसेवक, मनोज लासी, नगरसेवक, चंद्रावती देवीसिंग, नगरसेविका, ज्योती पाटील नगरसेविका, ज्योती चैनानी नगरसेविका, गजानन शेळके नगरसेवक, मंगल वाघे आरपीआय नगरसेवक, प्रमोद तळे पीआरपी नगरसेवक यांचा समावेश आहे. तर, कांबा व म्हारळ ग्रामपंचायतीचे भारती भगत सरपंच - कांबा गाव, संदिप पावशे उपसरपंच - कांबा गाव, निलेश देशमुख उपसरपंच - म्हारळ गाव, हरिदास पवार सदस्य - कांबा गाव, संतोष पावशे सदस्य - कांबा गाव, ईशा भोईर सदस्य - कांबा गाव, सोनाली उबाळे सदस्य - कांबा गाव, छाया बनकर सदस्य - कांबा गाव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. तसेच माजी नगरसेवक दर्शनिसंग खेमानी, मोहन गारो, राजू खंडागरे, होशियारिसंग लबाना, बाबू मंगतानी, लोकूमल कारा, हिरो केवलरामानी, ठाकूर चांदवानी, श्याम मेजर, मिनू दासानी, प्रिथ्वी वलेचा, राजू टेकचंदानी, गिरीधारी वधवा, भगवान लिंगे, फिरोज खान, गोदू क्रि ष्णानी, गजानन बामणकर, आंबू भिटजा, कमला कृष्णानी आदींचा त्यात समावेश आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आणखी काही नगरसेवक प्रवेश करणार असून त्यामुळे एकूण नगरसेवकांची संख्या 32 होईल असा विश्वास, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

पालिका निवडणुका आधी प्रवेश

महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने उल्हासनगर महानगरपालिकत राष्ट्रवादीचा महापौर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपामधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या पंचम कलानी यांच्या खांद्यावर आता शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी येत्या काळात उल्हासनगर महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा लागेल, असा दावा केला आहे.

हेही वाचा - भिवंडीत म्हाडाची २० हजार घरे उभारणार - जितेंद्र आव्हाड

पक्षांतरबंदी कायद्याची धास्ती

आज झालेल्या कार्यक्रमामध्ये अनेक नगरसेवक उपस्थित राहिले नाहीत. याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता त्यांनी पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांच्यावर ती कारवाई होऊ शकते. ही कारवाई टाळण्यासाठी ते उपस्थित राहिले नसल्याचा खुलासा केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.