ETV Bharat / city

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेच मुख्य सुत्रधार, सादर केले बोगस प्रतिज्ञापत्र - Uddhav Thackeray is the mastermind

एकनाथ शिंदे गटाकडून ( Eknath Shinde group ) आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यात आली असली तरी, उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याकडून मात्र बोगस सत्यप्रतिज्ञापत्र सादर ( Uddhav Thackeray submitted bogus affidavit ) करण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. तसेच उद्धव ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे.

Naresh Mhaske
नरेश म्हस्के
author img

By

Published : Oct 12, 2022, 7:58 PM IST

ठाणे - सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या शिवसेना पक्षाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शिंदे गटाकडून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यात आली असली तरी, उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याकडून मात्र बोगस सत्यप्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली आहेत.

नरेश म्हस्के यांची पत्रकार परिषद

बोगस प्रतिज्ञापत्र घोटाळा - या सत्यप्रतिज्ञापत्राची ( Uddhav Thackeray submitted bogus affidavit ) संख्या साडेतीन लाखांच्या घरात असल्याने हा महाराष्ट्रातील तेलगी घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा ( Bogus Affidavit Scam ) असून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून गैरवापर केल्याचा आरोप बाळासाहेच्या शिवसेनचे प्रवक्ते नरेश म्हस्के ( Shiv Sena spokesperson Naresh Mhaske ) यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षच बोगस असल्याचे ते म्हणाले. ठाकरेंच प्रतिज्ञापत्र घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप म्हस्के यांनी केला आहे.

सर्व प्रतिज्ञापत्र खोटी? - ८ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबईच्या निर्मलनगर पोलीस स्टेशन येथे एका सर्वसामान्य नागरिकाच्या तक्रारीनुसार भारतीय दंड संहिता कलम ४२० / ४६५ नुसार गुन्हा दाखल आहे. सदर दिवशी पोलीसांनी मा. न्यायालय, वांद्रे, मुंबई याच्यासमोर असलेल्या काही नोटरी करणाऱ्या कार्यालयांवर धाडी टाकल्या असता, तेथे ४ हजार ६८२ सत्यप्रतिज्ञापत्र आढळून आली होती. ती संबंधित विभागाने जप्त देखील केली आहेत. सदरची सत्यप्रतिज्ञापत्र ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या नागरिकांच्या नावे असल्याचे कळते.

करोड़ों रुपयांचा खर्च - सत्यप्रतिज्ञासाठी करोड़ों रुपयांचा खर्च झालेला आहे. यामध्ये कायद्याचे कुठलेही पालन न करता बेकायदेशीररित्या स्टॅम्प पेपर, लाल शिक्के, नोटरीचे स्वरस्टॅम्प याच्या माध्यमातून अनोळखी नागरिकांच्या आधारकार्डच्या झेरॉक्स पोलीसांकडून जप्त करण्यात आले आहेत. सदर सत्यप्रतिज्ञापत्रातील काही ठराविक नागरिकांना संपर्क केला असता त्या सर्वांनी आम्ही अशी कुठलीही सत्यप्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही सर्वच्या सर्व प्रतिज्ञापत्र खोटी असल्याचा दाट संशय निर्माण होतो.

मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी - वांद्रे, माहिम या ठिकाणी पोलीसांनी छापे टाकल्याचे समजते. ही सर्वच्या सर्व जप्त केलेली प्रतिज्ञापत्रे शिवसेना या पक्षासाठी बनविली गेल्याचे तपासात उघड झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे सत्यप्रतिज्ञापत्र कोण तयार करीत आहेत. ती खरी की खोटी याचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग युनिट ८ चे अधिकारी करीत असल्याचे माहिती मिळते आहे.

१० कोटींचा व्यवहार - वांद्रे न्यायालयासमोरील नोटरीकडून लाखोच्या संख्येने सत्यप्रतिज्ञापत्र नोटरी केल्या असतील तर ज्यांनी ही सत्यप्रतिज्ञापत्र केली आहेत ते स्वतः तेथे हजर होते का? त्यांची प्रत्यक्ष सही व नोंद नोटरीच्या रजिस्टरवर केली गेली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तसेच सादर करण्यात आलेल्या साडेतीन लाख सत्यप्रतिज्ञापत्रांना नोटरी करण्यासाठी १० कोटींचा व्यवहार करण्यात आलेला आहे असे समजते. ज्यांनी यही सत्यप्रतिज्ञापत्र नोटरीपर्यंत पोहचविली त्या वकील असून सध्या फरार आहेत. त्यांना शोधून काढून चौकशी करावी अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे.

शिंदे गटाची चौकशीची मागणी - बाळासाहेबांच्या शिवसेनेने पोलीसांकडे मागणी केली आहे की, याचा सखोल तपास झाला पाहिजे. सत्यप्रतिज्ञापत्र बनविण्यासाठी ज्या ज्या नागरिकांचे आधारकार्ड, फोटो, त्यांचे राहण्याचे ठिकाण याची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. जर कोट्यावधी रकमेचा व्यवहार शासनाचा महसूल बुडवून बेकायदेशीर कामासाठी होत असेल तर यात जे जे सहभागी आहेत त्यांच्यासह मुख्य सूत्रधाराची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशी मागणी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्याकडे आम्ही केली आहे. कारण हा संपूर्ण भारतात गाजलेल्या तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यासारखाच घोटाला असण्याची शक्यता असल्याने त्याचा मुख्य सूत्रधार हा हाती लागला पाहिजे.

राज्यात अनेक जिल्ह्यात तपास करावा - महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये असे झाले असून निवडणूक आयोगाकडे अशी सत्यप्रतिज्ञापत्र केली असल्याचा आमचा आरोप आहे. तरी प्रत्येक जिल्हयात जावून चौकशी करावी अशी मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.