ETV Bharat / city

रेड लाईट एरियात वेश्यागमनासाठी आलेल्या व्यक्तीकडून गोळीबार; परिसरात खळबळ - वेश्यावस्तीत गोळीबार

रेड लाईट एरियात वेश्यागमनासाठी आलेल्या व्यक्तीकडून गोळीबार; परिसरात खळबळ ...

रेड लाईट एरियात गोळीबार
रेड लाईट एरियात गोळीबार
author img

By

Published : Jun 28, 2021, 10:57 AM IST

ठाणे - भिवंडी शहरातील देह व्यापार करणाऱ्या हनुमान टेकडी या भागात वेश्यागमनासाठी आलेल्या दोघा व्यक्तींपैकी एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण रेड लाईट एरियात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

रेड लाईट एरियात व्यक्तीकडून गोळीबार
शारीरिक संबध करून खोली बाहेर पडताच गोळीबार ..

भिवंडीतील रेड लाईट एरिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या हनुमान टेकडी परिसरात ४०० ते ५०० महिला देहव्यापारांचा व्यवसाय करतात. त्यातच शनिवारी रात्रीच्या सुमारास एका कारमधून आलेल्या दोघा व्यक्तींनी तेथील महिलेसोबत शारीरिक संबध ठेवल्यावर खोली बाहेर पडले. त्याचवेळी कोणत्यातरी कारणावरून त्या दोघा व्यक्तींपैकी एकाने गल्लीत उभे राहत आपल्या जवळील रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी झाडली आणि परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

नागरिकांनी दगडफेक करून फोडली कारची काच-

गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण झाले. त्यांनतर गोळीबार करणारी व्यक्ती रस्त्यावर उभ्या असलेल्या आपल्या कारजवळ आली असता, स्थानिक नागरिकांनी त्याच्या दिशेने दगडफेक करून त्याच्या कारच्या काचा फोडल्या. त्यामुळे त्याने पुन्हा हवेत गोळीबार केल्याने तेथील दगडफेक करणारा जमाव पांगला होता. जमाव पांगल्याचा फायदा घेत गोळीबार करणारे त्या ठिकाणाहुन कारसह पसार झाले.

आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना ..

दरम्यान स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीत कारच्या काचा फुटल्या असून या घटनेची माहिती मिळताच स्थानिक भिवंडी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत घटनेची अधिक माहिती घेतली असता, त्यांना फरार आरोपींच्या कारचा नंबर मिळाला आहे. आता त्या दिशेने पोलिसांची पथके गोळीबार करून पसार झालेल्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. तर महिलेच्या तक्रारी वरून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल सुरू करण्यात आला. मात्र घटनेनंतर परिसरातील देहव्यापार करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.