ठाणे - कपडयांसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या 'मँचेस्टर ऑफ इंडिया' अशी ओळख असलेल्या भिवंडी शहरातील यंत्रमाग नगरीची धडधड नोटबंदी, सीएसटी आणि लॉकडाऊन या तीन गोष्टीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. ( MBBS ) यामुळे लाखो कामगार बेरोजगार होऊन शहराला बेरोजगारी आणि निराशाचे ग्रहण लागले. मात्र यावर मात करत विशेषतः तळागाळात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या तरुण - तरुणीने शहराची नवीन ओळख निर्माण केली आहे. गेल्या चार वर्षात या शहरात बेरोजगारी, निराशा, खडबडीत रस्ते आणि वाहतुकीच्या नावाखाली शून्य नियोजन आणि दाटवतीच्या वस्तीत राहून मुस्लिम समाजातील शेकडोच्यावर तरुणाईने एमबीबीएसचे शिक्षण घेत समाजाला नवी दिशा दाखविण्याचा संकल्प करून भिवंडीची नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
निराशेच्या काळात डॉक्टरांची एक नवीन जात उदयास - मुंबईपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर भिवंडी शहर असून या शहरात हजारो यंत्रमाग कारखाने, लाखो गोदामे असल्याने कामगारांची संख्या १० लाखांच्या जवळपास आहे. विशेष म्हणजे संपर्ण भारतातून या शहरात रोजीरोटीसाठी आलेल्या लाखो कुटूंबाचे जीवन केवळ दोन वेळेची उपजीविका करू शकते एवढी मजुरी मिळत असे, तसेच शहरात बहुतांश कामगार वस्तीत राहणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींचे शिक्षणही पूर्ण होत नसे, गेल्या ५ ते ६ वर्षापासून हळूहळू भिवंडी शहरातील कपडा उदयोग डबघाईला येऊन मँचेस्टर सिटी म्हणून आपली ओळख हरवत चालले आहे. त्यातच भिवंडीतील मुस्लिम समाजातील सर्व सामान्य कुटूंबामधील शेकडो मुलं - मुलींमध्ये उच्चपदवी घेण्यासाठी जिद्द निर्माण झाल्याचे पाहवयास मिळाले आहे. या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे की, सर्व एमबीबीएस पास विद्यार्थी आहेत. यामुळे भिवंडीच्या लोकप्रिय प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळी किमया या विध्यार्थ्यांच्या जिद्द आणि कुटूंबासाठी कायतरी करावे अशी अश्या बाळगून आहेत. दुसरीकडे ढासळत चाललेल्या शहरातील पायाभूत सुविधा आणि त्यातील यंत्रमाग, जे एकेकाळी अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार होते, ते आज अडचणीत आहेत. या निराशेच्या काळात डॉक्टरांची एक नवीन जात उदयास येत आहे. जी या शहराची प्रतिमा बदलू शकते.
डॉ. अब्दुल अझीझ यांना श्रेय - भिवंडीतील मुली NEET मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि त्याची तुलना मूक क्रांतीशी करता येईल. तरुणाईमध्ये एमबीबीएससाठी प्रवृत्त करण्याचे श्रेय अनेकांनी डॉ अब्दुल अझीझ यांना दिले. टेलर वसीम अन्सारी म्हणाले, “फीची व्यवस्था करण्यापासून ते विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रे मिळविण्यात आणि पडताळणी करण्यात मदत करण्यापर्यंत, एमबीबीएसमधील डॉ अब्दुल अझीझ विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम प्रेरक ठरले आहेत. मुलांपेक्षा सर्वाधिक अव्वल मुलीच ठरल्या असून शेकडोच्या घरात मुलीचं एमबीबीएसच्या विद्यार्थिनी आहेत. तर अनेक एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर इंटर्नशिप करत आहेत. यातील बहुतांश मुली अशा घरातील आहेत, ज्यांच्या संपूर्ण कुटुंबात डॉक्टर नाही. पण या मुलींच्या पालकांनी आपली मुलं डॉक्टर व्हावीत असं स्वप्न पाहिलं. पूर्वी ज्यांचे आई-वडील डॉक्टर आहेत, ती मुलंच डॉक्टर होऊ शकतात असा लोकांचा समज होता, पण भिवंडीच्या या नव्या पिढीने तो विचार मोडीत काढला. भिवंडीतील मुस्लिम समाजातील अनेक दानशूर व्यक्तीकडून या मुलांना प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि आर्थिक मदत केली जात आहे. जेणेकरून या मुलींना त्यांच्या अभ्यासात अडचणी येऊ नयेत.
टेलर आणि पान दुकानाच्या चालकाची मुलगीही एमबीबीएस - वसीम अन्सारी हे व्यवसायाने टेलरिंगचे काम करतात. त्याच्या दोन मुलींपैकी एक मुलगी एमबीबीएस करत असून धुळे येथील शासकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करत आहे. आणि दुसरी मुलगी कळवा हॉस्पिटलमधून एमबीबीएसची विद्यार्थिनी आहे. तिने यावर्षी कळवा हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस केले आहे. तर दुसरीकडे भिवंडीतील खाडीपार भागात छोटेसे पानाचे दुकान चालवणाऱ्या शाह जुल्फेकर यांचे स्वप्न होते की, आपल्या संपूर्ण घरात डॉक्टर नाही, पण त्यांनीही आपल्या मुलीला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न उराशी बागळून प्रयत्न करून निर्धार केला होता कि, आपल्या कुटुंबात मुलगी डॉक्टर बनून ती वडिलांचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल करणार, असे शाह जुल्फेकर यांनी ठरवले होते. विशेष म्हणजे भिवंडीतील शेकडो विद्यार्थिनी मुलुंडमधील क्लिअर कन्सेप्ट या खासगी कोचिंग क्लासेसमध्ये NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक मुली आज एमबीबीएसची विद्यार्थिनी आहेत.
हेही वाचा - Sonali Phogat case: सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात नवा खुलासा! मालमत्तेवर पीएची नजर होती असा वकिलांचा आरोप