ETV Bharat / city

ठाणेकरांच्या जीवाशी खेळ, बाहेरचं खात असात तर सावधान... - जीवावर

रस्त्यावर विकले जाणारे खाद्य पदार्थ अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि कोणत्याही प्रकारची स्वच्छता न राखता तयार केले जातात. अश्या तक्रारी नेहमीच समोर येत असतात. असाच एक गंभीर प्रकार ठाण्यातील जांभळी नाक्यावरील चॅट कॉर्नरच्या बाबतीत समोर आला आहे.

जांभळी नाक्यावरील चॅट कॉर्नर
author img

By

Published : Aug 5, 2019, 2:21 PM IST

ठाणे - भर पावसात गरमागरम भजी आणि वडापाव यांसारखे खाद्य पदार्थ खाने म्हणजे खवय्यांची पर्वणी. पण असले पदार्थ खाणे आता आपल्या जीवावर बेतू शकते. याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

जांभळी नाक्यावरील चॅट कॉर्नरचा व्हिडीओ व्हायरल

इडली - वडा, भजी, चायनिजच्या गाड्यांवर विकले जाणारे खाद्य पदार्थ अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि कोणत्याही प्रकारची स्वच्छता न राखता तयार केले जातात. अश्या तक्रारी नेहमीच समोर येत असतात. असाच एक गंभीर प्रकार ठाण्यातील जांभळी नाक्यावरील चॅट कॉर्नरच्या बाबतीत समोर आला आहे. नेहमीच खवय्यांची गर्दी असलेल्या या चॅट कॉर्नरचे कर्मचारी चक्क रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात भांडी धुवत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हीच भांडी पुन्हा खाद्य पदार्थ साठवण्यासाठी आणि ग्राहकांना पदार्थ खायला देण्यासाठी वापरली जातात. हा प्रकार एका दक्ष नागरिकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
यानंतर, उघड्यावरील खाद्य पदार्थ म्हणजे जीवाला धोका अशी भावना सध्या नागरिकांच्या मनात तयार होत आहे. तर महापालिकेने अशा खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ठाणेकर करीत आहेत.

Intro:ठाणेकरांच्या जीवाशी खेळ.. बाहेरचं खाताय तर सावधान...
Body:भर पावसात गरमागरम भजी आणि वडापाव सारखे पदार्थ खाने म्हणजे एक पर्वणी असते परंतु आता असले पदार्थ खाणे आपल्या जीवावर बेतू शकते. इडली वडा, भजी, चायनिज च्या गाड्यांवर विकले जाणारे हे पदार्थ अत्यंत निकृष्ट दर्जाचे तर असतातच परंतु ते बनवताना कोणत्याही प्रकारची स्वच्छता राखली जात नाही. असाच एक गंभीर प्रकार ठाण्यातील जांभळी नाक्यावर स्थित चॅट कॉर्नर च्या बाबतीत समोर आला आहे. नेहमी खवय्यांची गर्दी असलेल्या या चॅट कॉर्नर चे कर्मचारी भांडी चक्क रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात धुवत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हीच भांडी पुन्हा खाद्य पदार्थ साठवण्यासाठी आणि पदार्थ देण्यासाठी वापरली जातात. त्याचे हे कृत्य एका दक्ष नागरिकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले तेचा हा सर्व घृणास्पद प्रकार समोर आला आहे. त्याच्या या कृत्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने अशा उघड्यावर खाण्याचे पदार्थ विकणाऱ्यांवर त्वरित कारवाई करायला हवी अशी मागणी ठाणेकर नागरिक करत आहेत.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.