ETV Bharat / city

उपाशी राहण्यापेक्षा घरी जाऊन मरू; परप्रांतिय मजुरांची मन हेलावणारी व्यथा!

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांची टाळेबंदी वाढवून ३ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यातच संचारबंदी व टाळेबंदीच्या काळातच शेकडो परप्रांतीय मजूर घर गाठण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरून पायी चालत आहेत.

परप्रांतीय मजूर
परप्रांतीय मजूर
author img

By

Published : Apr 18, 2020, 8:23 PM IST

ठाणे - टाळेबंदी वाढल्याने शेकडो परप्रांतीय मजुरांची अवस्था 'आगीतून फुफाट्यात' अशीच झाली आहे. मजुरांनी उत्तरप्रदेश गाठण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरून पायी प्रवास सुरू केला. मात्र हे मजूर शहापूर तालुक्यात दाखल होताच काही ग्रामस्थांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांची टाळेबंदी वाढवून ३ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यातच संचारबंदी व टाळेबंदीच्या काळातच शेकडो परप्रांतीय मजूर घर गाठण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरून पायी चालत आहेत.

विशेष म्हणजे जिल्हाबंदी तसेच काही दिवसांपूर्वीच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तालुक्यातही सीमा बंदी केल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. मात्र असे असताना ठाणे, मुंबई परिसरातून हे परप्रांतीय मजुर शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आलेच कसे ? असा सवाल गाव-पाड्यातील ग्रामस्थांनी उपस्थित केला. ग्रामस्थ हे मजुरांसह स्थानिक प्रशासचा तीव्र विरोध करीत आहेत. त्यामुळे या परप्रांतिय मजुरांच्या जेवणाचा व राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा-कुत्रा सोडायला जायचंय..! लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यासाठी दाम्पत्याचे अजब उत्तर

मजुरांच्या माहितीप्रमाणे शहापूर प्रशासनाने राहण्याची सोय केलेल्या ठिकाणी जेवायला मिळत नाही. त्यामुळे उपाशी राहण्यापेक्षा घरी जाऊन मरू, अशा शब्दांत मजूर व्यथा व्यक्त करत आहेत. गावकऱ्यांकडून दगडफेक केली जाते. यामध्ये एखाद्या मजुराला दुखापत होण्याची शक्यता आहे. आता, तुम्हीच सांगा आम्ही जगायचे कसे ? असा सवाल विचारत आहेत. आम्हाला आमच्या गावाला जाऊ द्या, अशी मागणी या परप्रांतीय मजुरांनी केली आहे. त्यामुळे मजुरांची सोय केल्याचा स्थानिक प्रशासनाचा दावा फोल ठरल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा- धान्य वाटपाच्या आकड्यात तफावत, ही महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल नाही का? भाजपचा प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.