ठाणे - चारित्र्याच्या संशयावरून अनेक गुन्हे घडतात. मात्र, हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईसोबत सख्ख्या मुलाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सावत्र पित्याने २३ वर्षीय मुलाची हत्या केली. हत्येची घटना उल्हासनगर कॅम्प क्र. ४च्या सेक्शन २५ येथील कृष्णा नगरमध्ये घडली आहे. विजय चव्हाण असे अटकेतील सावत्र बापाचे नाव आहे.
विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी सावत्र बापाला अटक केली आहे. तर राजेश खरात (वय २३ ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. उल्हासनगर कॅम्प क्र. ४च्या सेक्शन २५ येथील कृष्णा नगरमध्ये विजय चव्हाण हा राहतो. त्यांच्यासोबतच मृत राजेश आणि त्याची आई देखील त्याच खोलीत राहत होते. मात्र, विजयला राजेश व त्याच्या आईचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून आरोपीने झोपेत असलेल्या राजेशच्या डोक्यात लोखंडी अँगल मारून ठार केले.
संशयापोटी राजेशची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. आरोपीने आई-मुलाच्या नात्यावर संशय घेऊन काळीमा फासला आहे. डे’ ला एक आठवडा होईपर्यंत एका बापाने आपल्या सावत्र मुलाची हत्या केल्याने परिसरात तर्कवितर्क करण्यात येत आहेत.
घटनेची माहिती मिळताच उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नराधम बाप विजय चव्हाण याला तात्काळ अटक करून ताब्यात घेतले आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक नंदकुमार खडकीकर हे करत आहेत.