ETV Bharat / city

पैशाच्या वादातून पोटच्या मुलानेच केली आईची हत्या, रचला आत्महत्येचा बनाव; आरोपी मुलाला बेड्या - आईची हत्या नायलॉनच्या दोरीने

ठाण्यात मुलाने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. खळबळजनक बाब म्हणजे आईची हत्या नायलॉनच्या दोरीने गळा आवळून घरात हत्या केली. तिचा मृतदेह पंख्याला लटकवला. आईने मारहाण करुन बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिने गळफास घेतल्याचा बनाव आरोपी मुलाने रचला होता. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात आईची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या.

Son killed mother and faked suicide accused arrested
पैशाच्या वादातून पोटच्या मुलानेच आईची हत्या करून रचला आत्महत्येचा बनाव
author img

By

Published : Sep 7, 2022, 4:02 PM IST

Updated : Sep 7, 2022, 6:53 PM IST

ठाणे : पैशाच्या वादातून पोटच्या मुलाने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. खळबळजनक बाब म्हणजे आईची हत्या नायलॉनच्या दोरीने गळा आवळून घरात हत्या केली. तिचा मृतदेह पंख्याला लटकवला. आईने मारहाण करुन बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिने गळफास घेतल्याचा बनाव आरोपी मुलाने रचला होता. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात आईची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या. ही घटना कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरातील एका इमारतीत घडली आहे. रवी पुमणी ( वय ३४ ) असे आईची हत्येप्रकरणी अटक मुलाचे नाव आहे. तर सरोजा पुमणी असे हत्या झालेल्या आईचे नाव आहे.

मौजमजा करण्यासाठी पैशाचा तगादा - आरोपी रवी हा मृतक आई सोबत कल्याण पूर्वेतील हनुमाननगर भागात प्रभुकुंज सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर राहतो. त्याला नोकरी, व्यवसाय नसल्याने तो नेहमीच मृत आई सरोजाकडे बाहेर मौजमजा करण्यासाठी पैशाचा तगादा लावत होता. मात्र सतत पैसे देणे शक्य नसल्याने मृतक आई सरोजाने त्याला नकार देत होती. त्यातच ५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मृत आई सरोजा व आरोपी मुलगा दोघे जण घरात होते. त्यावेळी त्यांच्यात घरगुती वाद होऊन त्याने पुन्हा पैशांच्या विषयावरुन वाद उकरून काढला. मात्र आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या रवीने आईशी भांडण करत तिला बेदम मारहाण करून रागाच्या भरात त्याने आईला जमिनीवर पाडून तिच्या गळ्याला नायलॉनच्या दोरीचा फास लावून तिची हत्या केली.

गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवले - खळबळजनक बाब म्हणजे आईची हत्या करून त्याने तिला घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवले. त्यानंतर एका नातेवाईकाला कॉल करून आईने मला बेशुद्ध होईपर्यंत मारले. त्यानंतर तिने गळफास घेतलाच बनाव केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे आरोपीने स्वतःलाच मारून गंभीर दुखापत केल्याने त्याच्यावर सुरवातीला संशय आला नाही. त्या दिवशी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत आईचा मृतदेह शवविच्छदेनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून जखमी मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

गळा आवळून हत्या केल्याची कबुली - आईच्या शवविच्छदेन अहवालात तिची हत्या झाल्याचे समोर येतच मुलाला काल ताब्यात घेऊन त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, या चौकशीत त्याने आपण आईची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आज दुपारच्या सुमारास आरोपी मुलाला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. एम. चव्हाण करीत आहेत.

Last Updated : Sep 7, 2022, 6:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.