ETV Bharat / city

बापरे बाप ! ॲक्टिवा दुचाकीत शिरला साप

गौरीपाडा परिसरात राहणाऱ्या अमित म्हात्रे यांच्या ॲक्टिवा दुचाकीत साप आढळला.

ॲक्टिवा दुचाकीत शिरला साप
author img

By

Published : Jul 26, 2019, 11:31 PM IST

ठाणे - घरासमोर उभ्या असलेल्या एका ॲक्टिवा दुचाकीत चट्याबट्याचा साप घुसल्याने दुचाकीस्वाराची चांगलीच धावपळ उडाली. ही घटना कल्याण पश्चिमेला गौरीपाडा परिसरात घडल्याने घराबाहेर दुचाक्या लावणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

ॲक्टिवा दुचाकीतून सापाला बाहेर काढताना सर्पमित्र

गौरीपाडा परिसरात राहणारे अमित म्हात्रे हे अ‍ॅक्टिवा दुचाकीने सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर त्यांनी घराबाहेर दुचाकी उभी केली. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास काही कामानिमित्त ते पुन्हा दुचाकी घेऊन बाहेर जाण्यास निघाले असता त्यांना दुचाकीमध्ये चट्याबट्याचा लालसर रंगाचा साप दुचाकीच्या हॅण्डलच्या बाहेर डोकावताना दिसला. या सापाला पाहून त्यांनी दुचाकी सोडून पळ काढला. त्यानंतर काही वेळाने त्यांनी वार संस्थेचे सर्पमित्र हितेश आणि गणेश खंडागळे या दोघांना संपर्क करुन दुचाकीत साप शिरल्याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच दोघेही सर्पमित्र घटनास्थळी पोहचले. मात्र, साप हॅण्डल आणि पुढील टायरच्या मधील भागात लपून बसल्यामुळे तो साप काढण्यासाठी त्यांना खूप वेळ लागला. अखेर त्यांनी हॅन्डलवरचे कवर काढून या सापाला २० ते २५ मिनिटानंतर दुचाकीतून बाहेर काढले. हा चट्याबट्या साप कवड्या जातीचा असून २ फूट लांबीचा आहे. वन अधिकाऱ्याची परवानगी घेऊन आज या सापाला जंगलात सोडण्यात आल्याची माहिती सर्पमित्र हितेश यांनी दिली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:बापरे बाप ! एक्टिवा दुचाकीत शिरला चटयाबट्याचा साप

ठाणे : घरासमोर उभी असलेल्या एका अॅक्टिवा दुचाकीत चटयाबट्याचा साप घुसल्याने दुचाकीस्वराची पळापळ झाल्याची घटना घडली आहे, ही घटना कल्याण पश्चिमेला गौरीपाडा परिसरात घडल्याने घराबाहेर दुचक्यांलावणाऱ्या मध्ये घबराट पसरली आहे,

कल्याण पश्चिम परिसरातून वार संस्थेच्या सर्पमित्रांनी गेल्या 22 दिवसात 100 हुन अधिक विषारी बिन विषारी सापांना मानवी वस्ती तुन पकडून जंगलात सोडल्याने या सापांना जीवदान मिळले आहे, त्यातच गौरीपाडा परिसरात राहणारे अमित म्हात्रे हे ॲक्टिवा दुचाकीने सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर घराबाहेर दुचाकी उभी केली होती, त्यानंतर रात्री अकराच्या दरम्यान त्यांना काही कामानिमित्त पुन्हा दुचाकी घेऊन बाहेर जाण्यास निघाले असता त्यांना दुचाकी मध्ये चट्याबट्याचा लालसर रंगाचा साप दुचाकीच्या हॅण्डल च्या बाहेर डोकावतांना दिसला, या सापाला पाहून त्यांनी दुचाकी सोडून पळ काढला. त्यानंतर काही वेळाने वार संस्थेचे सर्पमित्र हितेश आणि गणेश खंडागळे या दोघांना संपर्क करून दुचाकीत साप शिरल्याची माहिती दिली माहिती, मिळताच घटनास्थळी येऊन हे दोघेही सर्पमित्र एक्टिवा दुचाकीतुन तो साप काढण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र साप हॅण्डल आणि पुढील टायरच्या मधील भागात दळून बसला होता, अखेर त्यांनी हॅन्डल चे वरचे कवर काढून या सापाला वीस ते पंचवीस मिनिटानंतर दुचाकीतुन बाहेर काढण्यात यश आले, हा चटयाबट्या साप कवड्या जातीचा असून 2 फूट लांबीचा आहे, वन अधिकाऱ्याची परवानगी घेऊन आज या सापाला जंगलात सोडण्यात आल्याची माहिती सर्पमित्र हितेश यांनी दिली आहे,
ftp fid ( 2 vis, 2 photo )
mh_tha_3_snek_in_baik_vis_2_photo_2_10007

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.