ETV Bharat / city

ठाण्याची श्रुतीका माने ठरली ऑस्ट्रेलिया मिस इंडियाची विजेती - ऑस्ट्रेलिया मिस इंडिया स्पर्धा बद्दल बातमी

ठाणे येथिल डॉक्टर संदीप माने यांची कन्या श्रुतिका माने ऑस्ट्रेलिया मिस इंडिया ठरली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबई येथे होत असलेल्या मिस इंडिया स्पर्धेसाठी श्रुतिका माने ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधीत्व करणार आहे.

Shrutika Mane of Thane became the winner of Australia Miss India
ठाण्याची श्रुतीका माने ठरली ऑस्ट्रेलिया मिस इंडियाची विजेती
author img

By

Published : Jan 6, 2021, 8:13 PM IST

ठाणे - प्रसिध्द डॉक्टर संदीप माने यांची कन्या श्रुतिका माने ही ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत पहिली आली. श्रुतिका हिचा जन्म इंग्लडला झाला त्यानंतर ठाणे येथे आल्यावर सिंघानिया स्कूलमधून पुढील शालेय शिक्षण तिने केले. श्रुतिका सध्या ऑस्ट्रेलिया येथील एडलेड विद्यापीठातून एडव्हान्स हेल्थ एन्ड मेडिकल सायन्सच्या पदवीचे शिक्षण घेत आहे.

ठाण्याची श्रुतीका माने ठरली ऑस्ट्रेलिया मिस इंडियाची विजेती

ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय तरूणींसाठी मिस इंडिया स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या ७ स्पर्धकांची ऑनलाईन ऑडिशन व मुलाखत घेण्यात आली. ऑस्ट्रेलिया येथे राहत असलेले राज सुरी यानी सौदर्य स्पर्धेसाठी स्पर्धकाना मार्गदर्शन केले. श्रुतीकाने कत्थक नृत्याचे शिक्षण घेतले असून अनेक वक्तृत्व स्पर्धेत तिने यश संपादन केले आहे. तिला अभिनयाची आवड आहे. २००१ साली सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे ऑस्ट्रेलियास्थित भारतीय राज सुरी यानी मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेला सुरूवात केली. ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबई येथे होत असलेल्या मिस इंडिया जागतिक स्पर्धेसाठी श्रुतिका माने ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधीत्व करणार आहे.

माझ्या साठी अभिमानास्पद गोष्ट -

आपल्या यशाबद्दल बोलताना श्रुतिका ने मिस इंडिया ऑस्ट्रेलियासाठी माझी निवड झाली ही माझ्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. हा मुकुट म्हणजे एक जबाबदारी आहे ज्याची मला जाणीव आहे. भविष्यात आणखी काय असेल याची उत्सुकता मला लागली आहे. महाराष्ट्रातील बंधू भगिनींचा पाठींबा मिळाला त्यामुळे हे यश मी मिळवू शकले. जागतिक स्तरावर भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करण, त्यांच्यातील सामर्थ्य व कलागुण जगासमोर आणणे हा या स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश होता असे श्रुतिकाने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.