ETV Bharat / city

धक्कादायक! दुकानदाराचा अल्पवयीन नोकरावर अनैसर्गिक अत्याचार; नराधम मालकाला बेड्या

अंबरनाथ पूर्व भागातील एमआयडीसी परिसरामध्ये नराधम आरोपीचे चिकन-मटण बिर्याणी विक्रीचे दुकान आहे. या दुकानात पीडित अल्पवयीन मुलगा नोकर म्हणून काम करीत होता. त्यातच १३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पीडित मुलगा बिर्याणी विक्रीच्या दुकानात झोपला असता मालकाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

author img

By

Published : Nov 18, 2021, 8:03 PM IST

शिवाजीनगर पोलीस ठाणे
शिवाजीनगर पोलीस ठाणे

ठाणे - बिर्याणी विक्री करणाऱ्या ३५ वर्षीय दुकान मालकाने त्याच्या दुकानात नोकर म्हणून काम करीत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची( unnatural physical abuse with minor servant) धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ पूर्व भागातील एमआयडीसी परिसरात असलेल्या बिर्याणी विक्रीच्या दुकानात घडली आहे. उमरखान असे अटक केलेल्या नराधम मालकाचे नाव आहे.

अंबरनाथ पूर्व भागातील एमआयडीसी परिसरामध्ये नराधम आरोपीचे चिकन-मटण बिर्याणी विक्रीचे दुकान आहे. या दुकानात पीडित अल्पवयीन मुलगा नोकर म्हणून काम करीत होता. त्यातच १३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पीडित मुलगा बिर्याणी विक्रीच्या दुकानात झोपला असता मालकाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यांनतर दुसऱ्या दिवशी त्या पीडित मुलाने आईला फोन करून आपल्यावर मालकाने अत्याचार केल्याची माहिती दिली. त्यामुळे पीडित मुलाच्या आईने नराधम मालकाला त्या घटनेचा जाब विचारला. या गोष्टीचा राग येऊन दुकान मालकाने पीडित मुलाचे डोके जमिनीवर आपटून बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीमुळे पीडित मुलाचा चेहरा सुजला होता.

हेही वाचा-Illegal Liquor Confiscated : पाथर्डीत १० लाखाच्या अवैध दारुसह दोघांना अटक

ग्राहकामुळे अनैसर्गिक अत्याचाराचा प्रकार उघडकीस
दुकानात बिर्याणी घेण्यासाठी नेहमीप्रमाणे एक २२ वर्षीय ग्राहक आला होता. त्यावेळी त्या ग्राहकाने पीडित मुलाकडे चेहरा का सुजला याची चौकशी केली. तेव्हा मालकाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांनतर १५ नोव्हेंबर रोजी त्या ग्राहकाने पीडित मुलाला घेऊन अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाणे (shivajinagar Police station Thane) गाठले. ग्राहकाने पीडित मुलावरील अत्याचाराचा पाढाच वाचला (hotel customer helped minor victim) होता. तर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनीही नराधम मालकाविरोधात भादंवी ३७७, ३२५, कलमसह पोक्सो कलम ४ आणि ८ प्रमाणे गुन्हा दाखल (Thane crime news) केला. नराधमाचा शोध सुरू असता पोलीस पथकाने सापळा रचून १६ नोव्हेंबरला त्याला अटक केली आहे.

हेही वाचा-मुंबई पोलिसांची कारवाई; कोल्हापूरमधून 2 कोटी रुपयाचा ड्रग्ज साठा केला जप्त

पॉक्सो कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल-

सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) पॉक्सो कायद्याबाबत (pocso ) मोठा निर्णय दिला आहे. पोक्सो कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचार ठरवण्यासाठी शरीराचा शरीराशी संपर्क आवश्यक असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. 'स्पर्शाचा अर्थ शरीराचा शरीराशी संपर्कापर्यंत मर्यादित ठेवल्यास तो संकुचित आणि मूर्खपणाचा होईल. याचबरोबर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या या कायद्याचा हेतू देखील नष्ट होईल', असे न्यायालयाने नमूद केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.