ETV Bharat / city

भिवंडीत भाजप उमेदवाराची डोकेदुखी वाढली ; महायुती मेळाव्यावर शिवसैनिकांचा बहिष्कार - बहिष्कार

व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर ग्रामीण शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख विश्वास थळे, आमदार शांताराम मोरे, रुपेश म्हात्रे यापैकी कोणत्याही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो लावण्यात आलेले नव्हते.

मेळावा रद्द
author img

By

Published : Apr 16, 2019, 10:09 AM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यातील आंबाडी येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. परंतु, महायुतीच्या मेळाव्यावर शिवसैनिकांनी पुन्हा नाराजी व्यक्त करीत बहिष्कार टाकला. त्यामुळे मेळावा रद्द केल्याची घटना समोर आली आहे.

शिवसैनिकांचा युतीच्या मेळाव्यावर बहिष्कार

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात रविवारी सायंकाळी आंबाडी येथे जिल्हा परिषदेच्या आंबाडी, दाभाड, गणेश पुरी या जिल्हा परिषद गटांच्या युतीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मेळाव्याच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर ग्रामीण शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख विश्वास थळे, आमदार शांताराम मोरे, रुपेश म्हात्रे यापैकी कोणत्याही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांनी सभेवर बहिष्कार टाकत तीव्र निषेध व्यक्त करत सभेतून काढता पाय घेतला.

याबद्दल काही शिवसैनिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की भाजप नेत्यांच्या मनात अजूनही दुजाभाव आहे. तर, आम्ही कशासाठी थांबायचे. दरम्यान, शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि आमदार शांताराम मोरे मेळाव्यासाठी येत होते. नाराज शिवसैनिकांनी त्यांना रस्त्यात गाठून घेराव घालत संताप व्यक्त केला. तर, काहींनी जिल्हाप्रमुख आणि आमदार यांना सभेसाठी न जाण्याची विनंती केली. शिवसैनिक संतप्त झाल्याचे पाहून मेळाव्याच्या ठिकाणी त्यांनीही जाणे टाळले यामुळे हा मेळावा भाजप कार्यकर्त्यांनी रद्द केला.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसैनिकांमध्ये नाराजी अधिकच वाढू लागली आहे. यामुळे नाराज शिवसैनिकाच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे भाजपचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:भिवंडीत भाजपच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली ; महायुतीच्या मेळाव्यावर शिवसैनिकांचा बहिष्कार

ठाणे :- भिवंडी तालुक्यातील आंबाडी येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या मेळाव्यावर शिवसैनिकांनी पुन्हा नाराजी व्यक्त करीत बहिष्कार टाकल्याने अखेर हा युतीचा मेळावा रद्द केल्याची घटना समोर आली आहे,

भिवंडी लोकसभा मतदारसंघात जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे, तशी तशी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसैनिकामध्ये नाराजी अधिकच वाढू लागली आहे , यामुळे नाराज शिवसैनिकाच्या संख्येत वाढ होत असल्याने भाजपचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांची डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे.

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात रविवारी सायंकाळी अंबाडी येथे जिल्हा परिषदेच्या अंबाडी ,दाभाड , गणेश पुरी या जिल्हा परिषद गटांच्या युतीच्या कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, मात्र या मेळाव्याच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर ग्रामीण शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील तालुकाप्रमुख विश्वास थळे सेनेचे आमदार शांताराम मोरे, रुपेश म्हात्रे यापैकी कोणतेही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो बॅनर वर लावण्यात आलेले नव्हते त्यामुळे मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांनी या सभेवर बहिष्कार टाकत तीव्र निषेध व्यक्त करीत सभेचे ठिकाणाहून काढता पाय घेतला तर काहीच प्रतिक्रिया देताना सांगितले की भाजप नेत्यांच्या मनात अजूनही दुजाभाव आहे तर मी कशासाठी थांबायचे अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिल्या व 5 मिनिटात संपूर्ण मैदान रीकामे केले,

दरम्यान शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व आमदार शांताराम मोरे मेळाव्यासाठी येत होते, त्यावेळी नाराज शिवसैनिकांनी त्यांना रस्त्यात गाठून घेराव घालत संताप व्यक्त केला तर काहीनी जिल्हाप्रमुख आणि आमदार यांना ही सभेसाठी न जाण्याची शिवसैनिकांनी केलेली विनंतीकेली, शिवसैनिक संतप्त झाल्याचे पाहून मेळाव्याच्या ठिकाणी त्यांनीही जाणे टाळले यामुळे हा मेळावा भाजप कार्यकर्त्यांनी रद्द केला

बाईट, व्हिजवल, फोटो ftp

ftp folder ,,,, bhiwandi yuti melava, 15.4.19

Conclusion:भाजप उमेदवारांच्या अडचणीत वाढ
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.