ETV Bharat / city

Pratap Sarnaik : 'होय डोंबिवलीचा रिक्षावाला आमदार तर ठाण्याचा रिक्षावाला मुख्यमंत्री, आता चांगले दिवस येणार' - शिवसेनेचा मुख्यमंत्री

विधानसभेत काही आमदार ईडी ईडी असे ओरडत होते मात्र यावेळी आम्ही खरच ईडीचे म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्याचे प्रताप सरनाईक यांनी टिका करणाऱ्या आमदारांना उत्तर दिले असे सांगत होते. शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मी आवाज उठवला, त्यानंतर ईडीची ससेमिरा लागली. त्यावेळी जी मदत, जे सहकार्य मिळाले पाहिजे होते ते मिळाले नाही, असे प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांनी सेनेवर टिका करत ठाण्यात सांगितले आहे.

Pratap Sarnaik
Pratap Sarnaik
author img

By

Published : Jul 7, 2022, 6:48 PM IST

ठाणे - शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेस वाढत होती. त्यामुळे सर्व आमदारांची खदखद मी पत्राद्वारे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या कानावरती घातली होती. त्यावेळी त्या पत्राची दखल घेतली नव्हती. परंतु मला या गोष्टीचा आनंद वाटत आहे की, त्या पत्राची दखल राज्यातील शिवसेनेच्या 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी घेतली. अभिमानास्पद गोष्ट आहे, एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करत आलो आहे. होय मी डोंबिवलीचा आमदार रिक्षावाला आणि मुख्यमंत्री ठाण्यातला रिक्षावालाच त्यामुळे रिक्षावाल्यांना चांगले दिवस आले आहे असे आम्हाला वाटत आहे, असे प्रतिक्रिया प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांनी दिली आहे.

प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया

ED चे सरकार राज्यात - विधानसभेत काही आमदार ईडी ईडी असे ओरडत होते मात्र यावेळी आम्ही खरच ईडीचे म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्याचे प्रताप सरनाईक यांनी टिका करणाऱ्या आमदारांना उत्तर दिले असे सांगत होते. कंगना रणौत आणि अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात हक्क भंग मांडला. शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मी आवाज उठवला, त्यानंतर ईडीची ससेमिरा लागली. त्यावेळी जी मदत, जे सहकार्य मिळाले पाहिजे होते ते मिळाले नाही. मदतीची कुटुंबियांना अपेक्षा होती. ती मिळाली नाही असे सरनाईक यांनी सेनेवर टिका करत ठाण्यात सांगितले आहे.

हेही वाचा - Heavy Rain In Pune : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा; उपाययोजनांसह जिल्हा प्रशासन सज्ज

आज आयुक्तांच्या भेटीला - माझ्या मतदार संघात 300 कोटीचा निधी दिला आहे. त्यामुळे आता या निधीचा वापर कसा करायचा यासाठी पालिका आयुक्त विपिन शर्मा यांना भेटायला आलो असे सरनाईक यांनी सांगितले. शहरातील विकास कामे कशी करता येईल ते पाहू असे सांगितले. किरीट सोमैया कोण देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती कि मुख्यमंत्री, त्यांच्या व्यासपीठावरती मला जायलाच मिळाले पाहिजे असे नाही. ही न्यायालयीन लढाई आहे ते विरोधी होते तेव्हा त्यांनी माझ्यावरती आरोप केले आणि त्यांच्या आरोपाला मी प्रत्युत्तर दिले, त्यांनी माझ्यावरती केस दाखल केली. मी देखील त्यांच्यावरती केस दाखल केली. न्यायालयीन प्रक्रिया ही चालूच राहील हे सांगितले. एकनाथ शिंदे यांच्याबाबत विश्वासदर्शक ठराव झाला तेव्हा काँग्रेसचे आमदार अनुपस्थित होते, तर सरकार टिकेल की नाही हे त्यांनी सांगू नये असे प्रताप सरनाईक यानी सांगितले.

नगरसेवकांचे कौतुक - सर्व ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांच कौतुक करायला पाहिजे, एक दोन नव्हे तर 66 नगरसेवक हे शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, नवी मुंबई असुद्या सर्व नगरसेवक आमच्यासोबत आहेत आणि भविष्यात आम्ही त्यांच्या सोबत राहू असा विश्वास देखील वक्त केला आहे.

हेही वाचा - 66 Thane corporators : ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या 66 नगरसेवकांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट

हेही वाचा - Heavy Rain In Mumbai: पावसाचा दणका! तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस, २४ तासात ३ जखमी, वेगवान वारे वाहणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.