ठाणे - पालिकेचे सलग तीन वेळा महापौर, विधानपरिषद आमदार, शिवसेना उपनेते, एकविरा देवस्थानचे ट्रस्टी, कोळी समाजाचे नेतृत्व करणारे शिवसेना नेते अनंत तारे यांचा सोमवारी संध्याकाळी ५ च्या सूमारास मृत्यू झाला. त्यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी आखेरचा श्वास घेतला. अनंत तरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते.
दिगवंत अनंत तरे यांच्यावर तब्बल ८२ दिवस ठाण्याच्या खासगी ज्युपिटर रुग्णालय उपचार सुरु होते. अखेर सोमवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अनंत तरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सलग तीन वेळा महापौर पद भूषवले, एक वेळा विधान परिषद आमदार म्हणून ठाण्याचे नेतृत्व केले. त्यांनी दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढवली होती. कुलाबा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत बॅरीस्टर अंतुले यांच्या समोर अवघ्या २ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर अनंत तरे हे शिवसेनेचे उपनेते म्हणून शिवसेनेत कार्यरत होते. तरे एकविरा देवस्थानचे विश्वस्त होते. ते कोळी समाजचे अध्यक्ष होते. कोरोनाच्या काळात त्यांना लक्षणे जाणवल्याने त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या दरम्यान नंतर ब्रेन हॅमरेज मुळे त्यांचा सोमवारी पाचच्या सूमारास मृत्यू झाला घेतला.
साधू संत येती घरा ... तो ची दिवाळी दसरा चे जनक -
ठाण्यात लक्ष्मी पूजनाला अनंत तरे हे साधुसंतांना घरी बोलावून अन्नदानाचे कार्य करत होते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ते साधुसंतांच्या सानिध्यात राहून आप्तेष्ठ, सहकारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते संवाद साधत होते. ठाण्यात अशा प्रकारचा "साधू संत येती घरा तो ची दिवाळी दसरा" या स्नेह कार्यक्रमाचे ते जनक होते. अशा प्रकारचे सामुदायिक कार्यक्रम राबवणारे ठाण्यातील शिवसेना उपनेते, माजी महापौर, माजी आमदार अनंत तरे यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने ठाण्यातील राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे.