ETV Bharat / city

Kedar Dighe: शिवसेनेकडून केदार दिघेंची ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती; शिंदे-दिघे संघर्ष सुरू

author img

By

Published : Aug 2, 2022, 5:57 PM IST

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. ठाणे जिल्ह्याची जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी नव्याने केदार दिघे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे असून, आता ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध दिघे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

शिवसेनेकडून केदार दिघेंची ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती

ठाणे - एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. ठाणे जिल्ह्याची जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी नव्याने केदार दिघे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे असून, आता ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध दिघे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

केदार दिघे पत्रकारांशी बोलताना

ठाणेकरांना लवकरात लवकर याची माहिती द्या - दिघे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर केदार दिघे प्रतेक शाखेत जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मालेगावच्या सभेत आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत सर्व काही माहीत असल्याचे वक्तव्य केले होते. जर तुम्हाला आधीपासून माहीत होते तर इतके वर्ष का गप्प राहिलात असा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु, आता उशिरा का असेना पण ठाणेकरांना लवकरात लवकर याची माहिती द्या असे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी सांगितले. तर, ठाण्यात आनंद दिघे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य शिवसैनिक आहेत. त्यामुळे ठाण्यातील शिवसैनिक आमच्यासोबत असल्याचा दावा केदार दिघे यांनी केला आहे.

पुन्हा जिल्हाप्रमुख दिघे - आनंद दिघे हे ठाण्याचे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख होते. त्यांच्या निधनानंतर जिल्ह्याला मनोहर आंबवणे, रघुनाथ मोरे एकनाथ शिंदे आणि मग नरेश म्हस्के असा जिल्हाप्रमुख पदाचा प्रवास सुरु आहे. आता या पदावर पुन्हा दिघे यांचा पुतणे केदार दिघे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे दिघे यांचा शिष्य एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला दिघे यांचा पुतण्या असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा - Ajit Pawar : 'एवढे मोठे मंत्रिमंडळ की... '; अजित पवारांनी शेलक्या शब्दात घेतली शिंदे सरकारची फिरकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.