ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षाच्या बैठका घेऊन पक्ष वाढीसाठी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार NCP leader Sharad Pawar हे आले होते. त्यांनी जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने Central Govt दिलेल्या आश्वासनांचा पुढे काय झालं याचा पाढा वाचला. यावेळी त्यांनी मोरारजी देसाई Morarji Desai यांनी 82 व्या वर्षी मंत्रिपद मिळवले होते. त्याचा कित्ता गिरवणार नाही, असे सूचक Big statement Sharad Pawar वक्तव्य केले आहे.
110 वेळा धाडी टाकण्यात आल्या अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांवर 110 वेळा धाडी टाकण्यात आल्या आहेत. देशातील हा एक रेकॉर्ड झाला आहे. आतापर्यंत एवढ्या धाडी मी पाहिल्या नाहीत. 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत हे सत्र सुरू केला आणि आता हा घोटाळा 1 कोटींचा आहे, असे चार्ज शीट मध्ये सांगतात. हे विरोधकांना अडचणीत आणण्याचा घाट सीबीआय, ईडी ED raids आणि इन्कम टेक्सच्या माध्यमातून सुरू आहे, असे शरद पवार यांनी Big statement Sharad Pawar सांगितले आहे. देशातील अनेक राज्यात भाजप सत्ता BJP rule in state मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असल्याचा आरोप ही त्यांनी ठाण्यात केला आहे.
सत्तातरांनंतर आरोप प्रत्यारोप राज्यात झालेल्या सत्तातरांनंतर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत असून बंडखोरांचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी पहिल्यांदा ठाण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा आढावा पवार यांनी घेतला. पक्षाच्या कामासाठी ही बैठक घेण्यात आली होती. आमच्या पक्षातील नेत्यांनी प्रत्येक जिल्हयात जावे आणि सर्वांनी आढावा घ्यावा, असे ठरले आहे. त्याची सुरुवात ठाण्यापासून केली असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे ठाण्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याने पुढील निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे.
माझी ठाण्याची आठवण माझ्या लक्षात गोष्ट आली, मी ठाण्याला जवळून बघत आलो आहे. ठाणे म्हटल्यानंतर मी लहानापासून माझ्या सार्वजनिक जीवनाच्या प्रवेशापासून मी ठाण्याला फार जवळून बघत आलो आहे. ठाण्याचे एक वैशिष्ट्य अस होते. अत्यंत सुसंस्कृत नेतृत्व ठाण्याने दिले आहे. खंडू रांगणेकर, विमल ताई, प्रभाकर हेडगे, यडगावचे पाटील या सारखे अनेक नेते विशिष्ट दर्जानि, समाजकारण राजकरण करणारे ठाणे हे आमच्या निदर्शनास होते. मात्र हळूहळू पुन्हा अशी स्थिती निर्माण होईल, यासाठी ठाणेकरांनी काळजी घेतली, तर महाराष्ट्रावर उपकार होतील असे पवार यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा Loot in udaipur bank उदयपूरच्या मणप्पुरम गोल्ड ऑफिसवर दरोडा, 24 किलो सोन्यासह 10 लाख रुपये लुटूले