ETV Bharat / city

नवीन कोरोना रूग्णालयाच्या निधीवरून सेना-भाजपमध्ये जुंपली; राजकारण न करण्याचे महापौरांचे आवाहन

कोरोना रुग्णालयाच्या निधीवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे.नगरसेवक निधी देण्यास विरोध करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांना पत्र दिले आहे.तर यावर राजकारण होत नसल्याचे दोन्ही पक्षाकडून सांगण्यात येत आहे.तर मग कोरोना महासंकटवर राजकारण कोण करत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

new corona hospital
नवीन कोरोना रुग्णालय
author img

By

Published : May 9, 2020, 9:01 AM IST

Updated : May 9, 2020, 12:33 PM IST

ठाणे- कोरोना रुग्णांसाठी महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नगरसेवकांच्या निधीला कात्री लावली जाणार असल्याने भाजपने याला विरोध केला आहे. भाजपला आता महापौर नरेश म्हस्के यांनी थेट उत्तर दिले असून महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीचे जे राजकारण केले जात आहे तसे राजकारण आपण कृपया ठाण्यात करु नये, अशी विनंती केली आहे.

भाजपने ज्या बैठकीवर आक्षेप घेण्यात आला त्या बैठकीत यावर चर्चाच झाली नसल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले आहे. तसेच निधी देण्याबाबत सर्व नगरसेवकांनी अनुमती दिली आहे. त्यामुळे उगाच राजकारण करुन चांगल्या कामात खोडा न घालण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. कोरोना रुग्णालयासाठी नगरसेवक निधी वापरण्याऐवजी आपला दवाखाना निधी वापरावा, असे मत भाजपच्या नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. त्यावर महापौर नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये निधी वर्ग करण्याचा परस्पर निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. परंतु, या बैठकीमध्ये नगरसेवक निधीबाबत कोणत्याही प्रकारे चर्चा अथवा निर्णय झाला नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. त्यातही ही बैठक पालकमंत्र्यांनी शिष्टाचाराप्रमाणे बोलविलेली बैठक नव्हती, त्यामुळे या बैठकीस स्थानिक आमदार, कोकण पदवीधर आमदार, गटनेते यांना बोलवणे अपेक्षीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या कोरोनाची युध्दजन्य परिस्थीती असल्यामुळे ठाणेकरांच्या हितासाठी घेतलेल्या बैठकीचे राजकीय अर्थ लावून त्याचे राजकारण करु नये, असेही मस्के यांनी स्पष्ट केले.

चार महिन्यापूर्वी सर्व नगरसेवकांना 60 लाख रुपयांचा विशेष निधी उपलब करुन देण्याकरिता मी स्वत: व आमच्या पदाधिका:यांनी प्रशासनाशी संघर्ष केला त्यावेळी शिंदे यांनी मध्यस्थी करून सर्वपक्षीय प्रत्येक नगरसेवकांना तो विशेष निधी उपलब्ध करुन दिला. त्यावेळी तुमच्या गटनेत्यांनी हा निधी घेत असताना आमच्या नेत्यांशी बोला असे आम्हाला सांगितलेले नाही. त्यामुळे निधी घेताना आमदारांना सांगण्याची गरज वाटत नसेल तर 5 लाख रुपये निधी देताना मी नेत्यांशी व आमदारांशी चर्चा करणो संयुक्तिक वाटत नसल्याचे मस्के म्हणाले.

कोरोनासाठी मुंबईतील नगरसेवकांनी पाच लाख रुपयांची तरतूद केली, आपण ही असे करू अशी चर्चा आपल्या पक्षातील नगसेवकांनी नगरसेवक ग्रुपवर सुरू केली, त्यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी महापौरांच्या मनात देखील हा विषय आहे असे सांगत याबाबत महापौरांशी चर्चा करु असे नमूद केले. मुंबई महापालिकेने नगरसेवकांना निधी वर्ग करण्याचे जे पत्र दिले त्याची प्रत भाजपच्या नगरसेवकाने ग्रुपवर नगरसेवकांच्या माहिती साठी उपलब्ध करून दिली. तेव्हा आपल्याच पक्षातील नगरसेवकांनी होकार दिलेला आहे, त्यामुळे आता त्याला विरोध करणे अयोग्य असल्याचे महापौर मस्के यांनी सांगितले.

कोरोनाच्या महासंकटाचा विचार करुन सर्वपक्षीय नगरसेवकांनी नगरसेवक निधीबाबत बहुमताने घेतलेल्या निर्णयाचा आपण फेरविचार करुन राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून ठाणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून विचार करुन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Last Updated : May 9, 2020, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.