पिंपरी चिंचवड देहूरोड येथे एक शाळकरी मुलगी School girl sell liquor on dehu road गावठी दारू विकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत School girl selling liquor video viral आहे. तो व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते श्रीजित रामेशन RTI Worker Shrijeet Rameshan यांनी काढला असल्याचे उजेडात आले आहे. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे, गावठी दारूचे अड्डे illegal businesses in Pimpari chinchwad असतानाही देहूरोड पोलीस कारवाई करत नाहीत. village liquor dens within Dehurod police station त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी डीसीपी आनंद भोईटे Thane DCP Anand Bhoite यांनी संबंधित व्हिडिओच्या विषयी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
अवैध धंद्यांची पोलखोल करण्यासाठी बनविला व्हिडीओ देहूरोड पोलीस ठाण्याचा कारभार एक महिला पोलीस अधिकारी पाहते. आता अवैध धंदे, गावठी दारू बंद होईल अशी आशा सर्वांना होती. परंतु झालं उलट आणि तेथील अवैध धंदे, गावठी दारूच्या भट्ट्या अधिकच जोमात चालू लागल्या. वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा आशीर्वाद त्यांच्यावर असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी केला आहे. रमेशन यांनी देहूरोड हद्दीतील अवैध धंद्यांची पोलखोल करण्यासाठी एक व्हिडिओ टीम प्रत्येक ठिकाणी पाठवली. त्यात शाळकरी मुलगी गावठी दारू विकताना व्हिडिओतून उजेडात आले. विशेष म्हणजे एक महिला पोलीस अधिकारी एका शाळकरी मुलीला दारू विकण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळकरी मुलगी ग्राहकाला दारू किती द्यायची अशी विचारणा करत असून घरातच हा घरगुती बार थाटल्याचे पाहायला मिळतेय. यावर पिंपरी चिंचवड पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा Students sexually harassed मठाच्या स्वामीजींवर शिष्यांनी केला लैंगिक छळाचा आरोप, ५ जणांवर गुन्हा