ठाणे - ठाण्यातील मासुंदा तलावात आलेल्या सीगल पक्षांना वाचवण्यासाठी आता मोहीम हाती घेण्यात आली आहे. कारण नागरिकांनी त्यांना टाकलेले अन्न पदार्थ आता त्यांच्या जिवाबर बेतले आहे. अनेक पक्षांच्या मृत्यूनंतर आता वनविभाग आणि प्राणी मित्र संगठना रस्त्यावर उतरून ही मोहीम राबवत आहेत.
![Save seagull campaign](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/savesigalbirdsscriptwrapvarunpathavataahe_28012022174529_2801f_1643372129_738.jpg)
तलावांचे शहर म्हणून ठाण्याची ओळख -
ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते, या शहरातील ऐतिहासिक असलेल्या मासुंदा तलाव येथे मोठ्या प्रमाणात परदेशी पाहुणे असलेले सीगल गर्ल या पक्षांचे थवेच्या थवे आले आहेत. त्या पक्ष्यांना पाहण्यासाठी ठाणेकर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, याच दरम्यान नागरिकांकडून त्या पक्ष्यांना तेलकट खाद्यपदार्थांसह पाव आदी पदार्थ टाकले जात आहेत, त्यामुळे ते पक्षी टाकलेले खाद्य पदार्थ खाण्यास आकर्षित होताना दिसत आहे.
![Save seagull campaign](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/savesigalbirdsscriptwrapvarunpathavataahe_28012022174529_2801f_1643372129_164.jpg)
मात्र हे अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे हे परदेशी पाहुणे परतीचा प्रवास करताना त्यांना या खाद्यपदार्थामुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे करू शकत नाहीत आणि ते वाटेतच मृतावस्थेत मिळून येत असल्याने या पाहुण्यांना वाचवण्यासाठी ठाणे वनविभाग आणि वर्ल्ड वाइल्ड वेल्फेअर असोसिएशन यांनी पुढाकार घेऊन एक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
![Save seagull campaign](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/savesigalbirdsscriptwrapvarunpathavataahe_28012022174529_2801f_1643372129_724.jpg)
याच मोहिमेत ते नागरिकांना आवाहन करत आहेत की, या परदेशी पाहुण्यांना त्यांचे नैसर्गिक अन्नपदार्थ खाऊ द्या. त्यांना तेलकट आणि पाव आदी पदार्थ टाकू नये, असे आवाहन वनविभाग आणि वर्ल्ड वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे. शुक्रवारी मासुंदा तलाव येथे संयुक्त विद्यमाने दोघांनी 'मी जबाबदार तलाव प्रदूषित करणार नाही, तसेच मी पक्ष्यांना इजा पोचविणार नाही अशा आशयाचे फलक हाती घेऊन नागरिकांमध्ये जनजागृतीला सुरुवात केली आहे.
![Save seagull campaign](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/savesigalbirdsscriptwrapvarunpathavataahe_28012022174529_2801f_1643372129_657.jpg)
लवकरच लागणार कायमस्वरूपी बोर्ड -
आता मासुंदा तलावाच्या भोवती विविध ठिकाणी कायम स्वरूपी बोर्ड लावण्यात येणार आहेत. ज्यावर पक्षांना अन्न पदार्थ टाकू नयेत, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचे नमूद केले जाणार आहे. त्यासाठी ठाणे महानगर पालिकेची मदत देखील वन विभाग घेणार आहे.