ETV Bharat / city

महाराष्ट्राच्या लेकीने देशाची मान उंचावली, स्पेस यान बनवणाऱ्या टीममध्ये झाली निवड - पायलट

अंतराळ क्षेत्रात 'न्यू शेफर्ड' अंतराळ सफरचे लाँचिंग एक मैलाचा दगड समजला जात आहे. हे रॉकेट डिझाईन करणाऱ्या १० जणांच्या टीममध्ये संजल गावंडे हिचा समावेश असल्याने कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

sanjal-gavande-from-maharashtra-kalyan-will-be-a-part-of-rocket-trip-as-a-system-engineer
महाराष्ट्राच्या लेकीने देशाची मान उंचावली, स्पेस यान बनवणाऱ्या टीममध्ये झाली निवड
author img

By

Published : Jul 17, 2021, 4:37 AM IST

Updated : Jul 17, 2021, 6:15 AM IST

ठाणे : अंतराळ क्षेत्रात 'न्यू शेफर्ड' अंतराळ सफरचे लाँचिंग म्हणजे एक मैलाचा दगड समजला जात आहे. हे रॉकेट डिझाईन करणाऱ्या १० जणांच्या टीममध्ये कल्याण पूर्व मधील संजल गावंडे या तरुणीचा समावेश आहे. अमेरिकेमधील 'ब्लू ओरिजीन' या स्पेस कंपनीने अंतराळ सफरीची नुकतीच घोषणा केली असून २० जुलै रोजी या कंपनीतर्फे 'न्यू शेफर्ड' हे खासगी यान जगप्रसिद्ध ब्रँड अमेझॉनचे संस्थापक आणि ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांच्यासह काही निवडक पर्यटकांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे. इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण करत विविध परीक्षा देत संजलने उंचीवर झेप घेतली आहे. संजलच्या या यशामुळे तिच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संजल गावंडे हिचे आई-वडिल बोलताना...

संजलचा कल्याण ते अमेरिका प्रवास थक्क करणारा

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागात राहणारी संजलचा कल्याण ते सातासमुद्रापलिकडे अमेरिकेत मिशिगन, शिकागो, कॅलिफोर्निया आणि आता सियाटेल असा प्रवास थक्क करणारा आहे. अमेरिकेत सियाटेल येथील ब्लू ओरिजीन (BLUE ORIGIN) जी एक एयरो स्पेस (Aero Space) साठी नामंकित ड्रीम कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीतर्फे २० जुलै २०२१ ला न्यू शेफर्ड हे यान लाँच होत आहे. लहानपणापासून तिचे गगनाला गवसणी घालण्याचे जे ध्येय व स्वप्न होते ते आता खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे.

संजल मॅकेनिकल विषयासाठी ठाम

कल्याणमध्ये जन्मलेली संजल कोळसेवाडीतील डेल इंग्लिश हायस्कूलमध्ये दहावीपर्यत शिकली. लहानपणापासूनच तिने प्रथम क्रमांक येण्याचा मान कधीच सोडला नाही. त्यानंतर तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण कल्याण मधील बिर्ला कॉलेज येथेच झाले. बारावीचा अभ्यास करता-करता ती बिट्स, ऐट्रीपलई या परिक्षा देत होती. १२ वीचा फस्ट क्लास आणि सीईटीच्या मार्कवर तिला नवी मुंबईतील वाशी येथील फादर अग्नेल कॉलेज येथे प्रवेश मिळाला. त्यावेळी तिने मॅकेनिकल साईड निवडली. मात्र ती एक मुलगी असून मॅकेनिकल करण योग्य नाही, असे अनेकांनी तिच्या घरातील लोकांना सांगायला सुरूवात केली. दुसरीकडे संजलचे म्हणणे होते की, मी जर मॅकेनिकल विषय निवडला. यामुळेच मी माझे पुढचे ध्येय साध्य करु शकते. तिचा तो निर्णय ठाम होता.

वयाच्या २१ व्या वर्षी संजल सातासमुद्रापलिकडे

२०११ ला संजलने मुंबई विद्यापीठामधून प्रथम श्रेणीत मॅकेनिकल इंजिनियरची पदवी प्राप्त केली. हा अभ्यासक्रम पार पाडतानाच तिने जीआरई, टोफेलसारख्या कठिण परिक्षा दिल्या. त्यातही ती चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली. या सर्व परिक्षांच्या गुणांवर तिने अमेरिकेतील मिशिगन टेक विद्यापीठ येथे एमएससाठी अर्ज केला. आयुष्यात कधीही जवळून विमान पाहिले नव्हते. मग विमान प्रवास तर दूरच राहिला. अगदी वयाच्या २१ व्या वर्षी संजल विमानाने सातासमुद्रापलिकडे अमेरिकेला निघाली. मिशिगन टेक विद्यापाठीत संजलचे पुढील शिक्षण सुरू झाले. संपूर्ण चारी बाजूला बर्फच-बर्फ. या बर्फाच्छादित प्रदेशात कठिण परिस्थितीत कठोर अभ्यास करुन अखेर २०१३ ला प्रथम श्रेणीत पास होवून संजलने मेकॅनिकलमध्ये मास्टर ऑफ सायन्सची पदवी प्राप्त केली.

कॅलिफोर्नियाला जाण्याचे स्वप्न संपूर्ण

२०१३ ला संजलला विस्कानसिन मधील फॉन्ड्युलेक येथील मर्क्यूरी मरिन (Mercury Marine) या नामंकित कंपनीत जॉब लागला. तिच्या मनासारखा तिला जॉब मिळाला. परंतु तिचे लक्ष मात्र अवकाशाकडे होते. तेव्हा ती जमिनीवर शांत बसणारी मुलगी नव्हती. जॉब करता-करता शनिवार-रविवार सुट्टीमध्ये आराम न करता तिने विमान चालवण्याचे प्रशिक्षण चालू केले. विमान शिकण्यासाठी तिला तिचा मॅकेनिक अभ्यासक्रम कामी आला. अखेर तिची मेहनत कामी आली. १८ जून २०१६ ला तिला वैमानिक म्हणून लायसन मिळाले आणि ती विमानाने उंच भरारी मारु लागली. तिचे कॅलिफोर्नियाला जाण्याचे स्वप्न होते. तशी संधी ही चालून आली.

कलिफोर्निया मधील आँरेज सिटी येथील टोयाटो रेसींग डेव्हलपमेंट (Toyota Racing Development) या नामंकित कंपनीतून तिला कॉल आला. टोयाटोमध्ये मेकॅनिकल डिझाईन इंजिनियर म्हणून तिची कामाला सुरूवात झाली. रेसिंगच्या गाड्यांचे इंजिन ती डिझाईन करत होती. येथे ही तिने आपले वैमानिक शिक्षण सोडले नाही. अत्यंत कठोर मेहनतीने अखेर संजलला २०१८ ला कमर्शिअल पायलटचे लायसन्स मिळाले. इतकेच नव्हे तर नाईंटी नाईन इंटरनॅशनल ऑरगोनायजेशन ऑफ वूमन पायलट या संस्थेची ती चेअरमन झाली.

कठीण परिस्थितीत तिने मिळविले यश
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या संजल हिची आई सुरेखा गावंडे या एमटीएनएलमधील तर वडील अशोक गावंडे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील निवृत्त कर्मचारी आहेत. अतिशय कठीण परिस्थितीत तिने हे यश मिळवण्याचे तिच्या आईने सांगितले. तर कल्पना चावला आणि सुनिता विलियम्स याच्यासारखे अंतराळात जाण्याचे संजलचे स्वप्न आहे आणि ते ती पूर्ण करणार, असा विश्वास तिच्या वडिलांनी व्यक्त केला.

अमेरिकेमधील कमर्शिअल पायलटशी थाटामाटात लग्न
२०१८ ला तिच्या आयुष्यात जॉर्डन बाऊस ही व्यक्ती आली. जॉर्डन सियाटेल येथे बोईंग कंपनीत आहेत. ते सुद्धा एक कमर्शिअल पायलट आहे. जवळ-जवळ ९ वर्षे ते मिलिट्रीमध्ये होते. २०१९ ला संजल आणि जॉर्डन दोघेही भारतात आले. येथे त्यांचा थाटामाटात लग्न झाले. थोरा-मोठ्यांचे आशिर्वाद घेऊन ते अमेरिकेत परतले. सॉफ्टवेअर-हार्डवेअर कौशल्यामध्ये पारंगत असलेल्या संजलला ब्लू ओरिजीन या नामांकित कंपनीने न्यू शेफर्ड या मिशनसाठी सिलेक्ट केले. तिचे लहानपणापासूनचे जे स्वप्न होते ते खऱ्या अर्थाने पूर्ण झाले. २० जुलै २०२१ रोजी हे यान लाँच होत आहे.

हेही वाचा - भाजपला घाबरणाऱ्यांना पक्षाबाहेर हाकला, आपल्याला निडर लोक हवेत - राहुल गांधी

हेही वाचा - VIDEO : पालघरच्या विक्रमगडयेथील जांभा फरशी येथे आढळून आला दुर्मिळ शॅमेलियन सरडा

Last Updated : Jul 17, 2021, 6:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.