ठाणे - नशेबाजीचा व्यापार रोखण्यास पोलीस कठोर कारवाई करीत नसून केवळ नशाबाजांवर कारवाई करते, मात्र नशेबाजीच्या सौदागारांकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्यानेच नशापान करूनच सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडत असून जसे बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरदूत केली. तशीच नशेबाजीच्या सौदागारांसाठीही फाशीची शिक्षेची मागणी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी भिवंडीतील कार्यकर्ता मेळाव्यात पत्रकारांशी बोलताना केली आहे.
अमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाईवर सवाल
आपल्याला व समाजवादी कार्यकर्त्यांना १ महिन्यासाठी नशेबाजीच्या सौदागारांवर कारवाईसाठी परवानगी द्यावी, नंतर बघा १ महिन्याच्या आत हातात दांडके घेऊन नशेचा व्यवसाय बंद नाही केला तर मी समाजवादी पार्टीचा राजीनामा देऊन राजकारण सोडून देईल, असे आवाहना करीत पोलीस तर एका दिवसात नशेचा व्यापार बंद करू शकतात, मात्र तसे होताना दिसत नाही. असे बोलून त्यांनी अमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाईवर सवाल उपस्थित केला आहे.
'तेरा वही होगा जो शोले मे कालिया का हुआ था'
पुढील वर्षी भिवंडी महापालिकेची निवडणूक असून यामुळेच तुम्ही मेळावा घेऊन भिवंडी शहराची जबाबदारी घेतला का? पत्रकाराच्या या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले, की भिवंडीत समाजवादी पार्टीचा आमदार निवडून आल्यापासून विकासकामांना सरकारने निधी दिला नसल्याचे आझमी यांनी सांगत जर आम्हाला निधी दिला तर आम्ही शहराचा विकास करू, ही त्यांना भीती आहे. जर विकास झाला तर त्यांची परिस्थिती 'शोले'च्या कालियासारखी होईल, असा टोला विरोधकांना लगावत काँग्रेस-शिवसेनेवर निशाणा साधला.
मेळाव्यात कोरोनाच्या नियमाला हरताळ
कोरोनाच्या काळापासून सार्वजनिक ठिकाणी सभा, मेळावे घेण्यास आजही बंदी आहे. तरीदेखील भिवंडीतील समाजवादी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाय एकाच्याही तोंडाला मास किंवा कपडा दिसत नव्हता. तर सामाजिक अंतरचेही तीन तेरा वाजले होते. यावर आझमी यांना प्रश्न विचारला असता, कुठे आहे आता कोरोना, कोरोना संपला आहे. 'कोरोना जा, कोरोना जा' असे बोलून काढता पाय घेतला.