ETV Bharat / city

VIDEO धावती लोकल पकडताना रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेचे आरपीएफ जवानाने वाचविले प्राण - आरपीएफ जवानाने वाचवले महिलेचे प्राण

धावती लोकल पकडताना तोल जाऊन लोकल रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेचे कर्तव्यावर असलेल्या जवानाने प्राण वाचवले. ही घटना मुंब्रा स्टेशनवर रात्री साडेबारा वाजता घडली.

RPF jawans save woman life
आरपीएफ जवानाने वाचविले प्राण
author img

By

Published : Dec 13, 2020, 9:17 PM IST

Updated : Dec 13, 2020, 9:25 PM IST

ठाणे - "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीची प्रचिती मुंब्रा स्थानकावर आली. रेल्वे लोकलखाली येणाऱ्या महिलेला रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या आरपीएफ जवानाने वाचविले. महिलेचे प्राण वाचल्याची घटना घडली. शनिवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरपीएफ जवान मंगेश वाघ हा महिलेचा प्राणरक्षक ठरला. त्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

लोकलखाली जाणाऱ्या महिलेचे आरपीएफ जवानाने वाचवले प्राण
नशिबाने साथ दिलेली महिला जिया शहजाद शेख(४५) रा. मुंब्रा हि महिला शनिवारी रात्री मुंब्रा स्थानकावर आपली मुलगी नाजिया सोबत आली. रेल्वे स्थानकावर आलेली सीएसटी लोकल पकण्यासाठी मुलगी नाजिया धावली. तिने लोकल पकडली ही मात्र जिया यांना लोकल पकडणे शक्य झाले नाही. धावती लोकल पकडण्याच्या खटाटोपात जिया या खाली पडल्या आणि गडगडत रेल्वे लोकल आणि प्लॅटफॉर्म मधील गॅपमधून लोकलच्या खाली जात असतानाच कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवान मंगेश वाघ याने विजेच्या चपळाईने जिया यांना पकडले आणि तिचे प्राण वाचले. जिया शेख यांनी वाघ यांचे आभार मानले तर सर्व प्रवाशांनी मंगेश वाघ याचे कौतुक केले. याच ठिकाणी याआधी अनेकदा रेल्वे पोलिसांनी अशाच प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशांचे जीव वाचवले आहेत. याआधी मागील सहा महिन्यांत अशा प्रकारच्या दोन घटना झालेल्या आहेत.

Last Updated : Dec 13, 2020, 9:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.