ETV Bharat / city

'प्रोटोकॉलनुसार रुग्णांना रेमडेसिवीर दिल्यास टंचाई जाणवणार नाही' - thane covid news

कोविड टास्क फोर्सने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार खासगी डॉक्टरांनी सरसकट सर्वांऐवजी अत्यावश्यक रुग्णालाच हे इंजेक्शन लिहून दिल्यास त्याचा तुटवडा भासणार नाही. तसेच येत्या 3-4 दिवसांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे.

remdesivir injection
remdesivir injection
author img

By

Published : Apr 8, 2021, 5:48 PM IST

ठाणे - गेल्या काही दिवसांपासून अचानक कोरोनारुग्णांची संख्या वाढल्याने सध्या ठाणे जिल्ह्यासह मुंबईत रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत आहे. मात्र कोविड टास्क फोर्सने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार खासगी डॉक्टरांनी सरसकट सर्वांऐवजी अत्यावश्यक रुग्णालाच हे इंजेक्शन लिहून दिल्यास त्याचा तुटवडा भासणार नाही. तसेच येत्या 3-4 दिवसांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे.

रुग्णाचे नातेवाईक तास न् तास रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रांगेत

रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक अक्षरशः वणवण फिरत आहेत. केवळ शहारातीलच मेडीकल नव्हे तर आजूबाजूच्या शहरांतील मेडिकलच्या पायऱ्या झिजवूनही त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. तर मोजक्या मेडिकलमध्येच हे इंजेक्शन उपलब्ध असून याठिकाणी रुग्णाचे नातेवाईक तास न् तास रांगेत उभे राहत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सने खासगी डॉक्टरांना कोविड रुग्णांबाबत दिलेल्या ए, बी, सी, डी आणि ई या वर्गवारीनुसार इंजेक्शन लिहून दिले पाहिजेत. सरसकट सर्वांना ते लिहून न देता ज्या रुग्णाला गरज आहे त्यालाच लिहून दिल्यास सध्या निर्माण झालेली टंचाई कमी होण्यास मोठी मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

'औषध विक्रेत्याचा परवाना रद्द करा'

रेमडेसिवीर इंजेक्शन बनवण्यासाठी पूर्वी दोनच कंपन्या होत्या आता तर त्याची संख्या 6 झाली आहे. मात्र सध्या कोरोना रुग्णवाढीनुसार खासगी रुग्णालयेही वाढली आणि त्यातही डॉक्टरकडून सरसकट प्रत्येक रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन लिहून देत असल्याने सध्याची परिस्थिती निर्माण झाल्याचेही ते म्हणाले. तर यामध्ये जो कोणी व्यक्ती किंवा एखादा केमिस्ट असोसिएशनचा सदस्य रेमडेसिवीरचा काळा बाजार करत असेल तर त्याच्यावर एफडीएने कारवाई करून लायसन्स रद्द करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. तसेच येत्या 3-4 दिवसांत रेमडेसिवीरचा मोठा साठा उपलब्ध होणार असून लोकांना मुबलक प्रमाणात ते उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.