ठाणे - रझा अकादमी भिवंडीचे अध्यक्ष मोहम्मद शकील रजा मोहम्मद इलियास मोमीन यांना ( President of Bhiwandi Raza Academy ) अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअपवर घाणेरड्या शब्दांत संदेश पाठवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ( Bhivandi police probe on threat to Raza president ) आला आहे. या घटनेमुळे रझा अकादमीचे कार्यकर्ते व सदस्यांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
रझा अकादमीचे भिवंडीचे अध्यक्ष शकील मोमीन ( Shakil Momin complaint in Bhivandi Police ) यांनी भिवंडीचे सहाय्यक पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग आणि भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना लेखी तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी अज्ञात व्यक्तीकडून आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यात व्हॉट्सअपवर धमकी देताना अश्लील शब्द नमूद केले आहेत. तसेच तक्रारीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, २ दिवसांत त्यांना ठार मारणार आहे. मृतदेह सापडणार नाही अशा ठिकाणी मृतदेह फेकून देईन. धमकीचा मेसेज पाठवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा सांगण्यात आले.
![रझा अकादमीचे अध्यक्ष](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-tha-4-bhiwani-2-phptp-mh-10007_13012022234149_1301f_1642097509_1098.jpg)
आरोपीला लवकरच अटक करू
माध्यमांशी बोलताना मोहम्मद शकील रझा म्हणाले की, व्हॉट्सअपवर असा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीबाबत तो कोण आहे हे मला माहीत नाही? परंतु असे मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीपासून मला आणि माझ्या कुटुंबाच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका आहे. त्यामुळे धमकी देणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. त्याला लवकर अटक करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे.
रझा अकादमीच्या संस्थेचा भिवंडीत मोठा विस्तार
रझा अकादमीच्या संस्थेचा भिवंडीत मोठा विस्तार आहेत. त्याच्या समर्थकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या व्यतिरिक्त शकील रझा अनेक धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या ट्रस्टमध्ये सक्रियपणे सहभागी आहे. निवेदन देताना त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भिवंडी शहर अध्यक्ष शोएब गुड्डू, नगरसेवक याकूब शेख, शारजील रझा, वकास रझा, सय्यद अब्दुल हमीद, मेहबूब बाबा, अल्ताफ मोमीन, साजिद दुधवाले, सय्यद तंजील, सैफ अहमद, फुरकान, कामरान, सईद,शोएब, रेहान मोमीन, सय्यद शोएब, कासीम, हाशिम आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
हेही वाचा- Bull Bai App Case : श्वेता सिंग, मयंक रावलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी