ETV Bharat / city

कोरोनावर पथनाट्य सादर करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी - thane latest news

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दोन दिवसापूर्वीच राज्य शासनाने आदेश काढून जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे नागरिकांना आवहान केले होते.

कोरोनावर पथनाट्य सादर करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

author img

By

Published : Apr 14, 2021, 8:12 PM IST

ठाणे - गेल्या वर्षीपासून सुरु असलेला कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवाळीमध्ये बऱ्यापैकी आटोक्यात आला होता. विशेष म्हणजे कोरोनाला आळा बसावा म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना लॉकडाऊन व अनलॉक कालावधीत राबविण्यात आल्या. एवढे करूनही महाराष्ट्रात पुन्हा दुसऱ्यांदा लॉकडाऊन होत आहे. दरम्यान, सरकारी नियमाचे पालन करून शहापूर शहरातील रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर पथनाट्य सादर करत कोरोनापासून बचाव करण्याचा संदेश देत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी केली आहे.

कोरोनावर पथनाट्य सादर करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
लॉकडाऊनच्या पार्श्ववभूमीवर गरीब - गरजू कुटुंबांना धान्य वाटप

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दोन दिवसापूर्वीच राज्य शासनाने आदेश काढून जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे नागरिकांना आवहान केले होते. शासनाने दिलेल्या नियमानुसार रमाबाई ब्रिगेड महिला संघटना अध्यक्ष संस्थापक श्रीमती ज्योती भगवान गायकवाड यांच्या हस्ते शहापुर मधील गोरगरीब कुटूंब, महिला, व्यापारी, फेरीवाले, पोलीस कर्मचारी, शहापुर नगर पंचायत सफाई कामगार, तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी, तसेच बाजारपेठात विना मास्क फिरत असलेल्या नागरिकांना मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

तसेच आज रात्रीपासून पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याच्या पार्श्ववभूमीवर उद्योजक आकाश सांवत आणि डॉ. कामिनी सांवत यांच्या वतीने गरीब गरजू कुटुंबांना धान्य व इतर गरजेच्या वस्तू वाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

हेही वाचा- भंडारा : जमिनीच्या वादातून प्रॉपर्टी डीलरची हत्या, 3 आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.