ETV Bharat / city

खंडणीचा गुन्हा प्रकरण : प्रदीप शर्माने जामीनअर्ज घेतला मागे - Pradip Sharma withdraws bail

ठाण्याच्या ठाणेनगर पोलीस ठाण्यात ३० जुलै रोजी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि चकमक फेम प्रदीप शर्मा यांच्या टीमसह तब्बल २८ जणांवर खंडणी, धमकावणेसह विविध गुन्हे दाखल आहेत.

thane court
ठाणे न्यायालय
author img

By

Published : Aug 9, 2021, 7:58 PM IST

Updated : Aug 9, 2021, 8:10 PM IST

ठाणे - ठाणेनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालेले तीन आरोपी प्रदीप शर्मा, सुनील देसाई आणि विकास दाभाडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सेशन न्यायालयात अर्ज केला होता. दरम्यान, विकास दाभाडे याने अर्ज मागे घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनीही कुठलेही कारण न देता जामीन अर्ज मागे घेतला. तर याच प्रकरणातील सुनील देसाई यांचे वकील गैरहजर राहिल्याने त्यांच्या अर्जावर १९ ऑगस्ट रोजी सुनावणी करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

सागर कदम - तक्रारदाराचे वकील

दुसरीकडे आरोपी विमल अगरवाल हे CCTV मध्ये नाचत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे आरोपी मोकाट असून, यामुळे तक्रारदार केतन तना याचे कुटुंबीय भीतीच्या वातावरणात असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे.

हेही वाचा - ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी छोटा राजनच्या पुतणीला अटक

  • काय आहे प्रकरण?

ठाण्याच्या ठाणेनगर पोलीस ठाण्यात ३० जुलै रोजी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि चकमक फेम प्रदीप शर्मा यांच्या टीमसह तब्बल २८ जणांवर खंडणी, धमकावणेसह विविध गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता. या २८ जणांपैकी तिघांनी ठाणे सेशन न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तर सुनावणीपूर्वीच विकास दाभाडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. तर सोमवारी ९ ऑगस्ट रोजी चकमक फेम प्रदीप शर्मा यांनी कुठलेही कारण न देता जामीन अर्ज मागे घेतला. तर न्यायालयात आज सुनील देसाई यांच्या जामीन अर्जावर असलेली नियोजित सुनावणी सोमवारी होणार होती. मात्र, देसाई यांचे वकील गैरहजर राहिल्याने सुनावणी न्यायालयाने पुढे १९ ऑगस्ट रोजी ढकलली. तसेच तक्रारदाराचे कुटुंब दहशतीच्या सावटाखाली असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.

दरम्यान, ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात २८ जणांचा समावेश आहे. यात पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत एकाही आरोपीला अटक न झाल्याने तक्रारदार हे दहशतीच्या सावटाखाली आहेत. या प्रकरणात ज्यांच्यावर खंडणीचे आरोप आहेत ते सर्व मोठे पोलीस अधिकारी, ठेकेदार आणि व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून तक्रारदारांच्या जीवाचा धोका असल्याने आज वकिलांनी त्यांच्या सुरक्षेची देखील मागणी केली आहे.

  • रवी पुजारी देखील आरोपी -

या गुन्ह्यात रवी पुजारी हा देखील एक आरोपी आहे. आतापर्यंत रवी पुजारीने अनेकांना फोन करून, त्यांची हत्या केली आहे. त्यामुळे हा देखील मोठा धोका तक्रारदारांना आहे. याबद्दलही सुरक्षेची मागणी केली आहे.

  • फरार आरोपी नाचताना दिसतोय सीसीटीव्हीमध्ये -

याच गुन्ह्यातील आरोपी विमल अग्रवाल हा पार्किंगमध्ये नाचत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या गुन्ह्यात आरोपी असलेल्यांकडे अजूनही शस्त्र आहेत. त्यामुळे तक्रारदार धास्तावलेले असल्याचे तक्रारदारांचे वकील सागर कदम यांनी सांगितले.

हेही वाचा - खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल, रवी पुजारीच्या नावाचाही समावेश

Last Updated : Aug 9, 2021, 8:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.