ठाणे - राज्यात सुरू असलेल्या राजकीय भूकंपाचे पडसाद ( political crisis affect ) आता सर्व गोष्टीवर पहायला मिळत आहेत. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा ( Scheduled Castes and Tribes Commission )ठाण्यातील दौरा रद्द करण्यात आला आहे. भिवंडी महापालिकेत ( bhiwandi municipal corporation ) राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा दौरा आयोजित करण्यात आला होता. अनुसूचित जाती - जमाती वस्तीकरीता असलेला राखीव निधी आणि त्यामधून करण्यात आलेली विकास कामे आदींबाबतीत हा दौरा होता..
गेल्या तीन दिवसांपासून राज्यात आलेल्या राजकीय भूकंपामुळे हा दौरा रद्द केल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. राज्य अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर, सदस्य आर. डी. शिंदे (सेवा), के. आर. मेढे (सामाजिक व आर्थिक) या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज आयोगाचा दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र, मंत्री एकनाथ शिंदे ( eknath shinde ) यांनी शिवसेनेशी बंड करून ३७ आमदारांसह आधी सुरत गाठले. त्यानंतर गुवाहाटीहून इंफाळला मुक्काम करून राज्यात नवीन सरकार आणण्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. विशेष म्हणजे बंड पुकारणाऱ्या शिवसेना आमदारांमध्ये भिवंडी ग्रामीण मधील अनुसूचित जमातीचे आमदार शांताराम मोरे यांचा समावेश आहे. ते सध्या शिंदे गटात सामील आहेत. त्यामुळे सदस्य असलेले आमदार उपस्थित राहू न शकल्याने त्याचा परिणाम अनुसूचित जाती - जमाती आयोगाच्या दौऱ्यावर झाला. त्या पार्श्वभूमीवर अखेर दौरा रद्द करण्यात आला आहे.
दुसरीकडे राज्यात वाढलेली महागाई आणि दलित - आदिवासींना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी येणाऱ्या समितीचा अचानक दौरा रद्द करण्यात आल्याने दलित आदिवासी बांधवांमध्ये संताप व्यक्त केला जात असल्याचे दिसून येत आहे. तर दौरा रद्द होण्याबाबत भिवंडी महापालिकेचे आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्याशी संपर्क साधला असता आज दौरा रद्द जरी करण्यात आला असला, तरी राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग पुढील महिन्यात महापालिकेत येणार असल्याचे सांगितले. तसेच, आयुक्त म्हसाळ यांना अनुसूचित जमातीचे बंडखोर आमदार शांताराम मोरे यांच्यामुळे दौरा रद्द करण्यात आला का? असे विचारले असता त्यावर सतर्कतेची भूमिका घेत त्यांनी बोलणे टाळले आहे.
हेही वाचा - चंद्रभागा आजींनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; म्हणाल्या, 'ऑटोवाल्याला आम्ही....'