ठाणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी कायदा लागू आहे. त्याचबरोबर, पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी देखील रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानुसार आज शहरात नागरिकांनी बंद पाळला. मात्र, काही लोकांनी उपरोक्त सर्व खबरदारींची तमा न बाळगता शहरात संचार केला आहे. त्यामुळे, पोलिसांनी अशा ४० नागरिकांवर कलम १८८ नुसार कारवाई केली आहे.
कोरोना विषाणूबाबत खबरदारी म्हणून केंद्र व राज्य सरकार समन्वयाने काम करत आहे. शहरात जमावबंदी कायदा लागू आहे. नारिकांनी गर्दी करू नये यासाठी राज्य सरकारने उद्यापासून कलम १४४ देखील लागू केले आहे. मात्र, नागरिक या सर्व बाबींची पायमल्ली करताना दिसून आले आहे. पोलिसांनी शनिवारी जमावबंदी कायद्याची अवाज्ञा करणाऱ्या ३७ जणांवर कारवाई केली असून आज ३ नागरिकांवर कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
हेही वाचा- लग्नात सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप, फक्त ५० जणांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा